मुंबई

भिवंडी मनपातील भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाईचे मंत्र्यांचे आश्वासन

X: @therajkaran

नागपूर: भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात नाले-गटारी सफाईसाठी लाखो रुपये घेऊन अपहार केल्याप्रकरणी प्रभाग अधिकारी यांच्या विभागीय चौकशीचा अहवाल पंधरा दिवसांत मागवून कारवाई करण्यात येईल, असे उत्तर मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तर तासात दिले. निलेश लंके यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता.

या अधिकाऱ्यावर दोषारोप निश्चित करुन निलंबित व बडतर्फ करण्याची मागणी राष्ट्रीय मानव हक्क मंचच्या अध्यक्षांनी भिवंडी मनपा आयुक्तांना केली हे खरे आहे का? असाही प्रश्न उपस्थित केला. रईस शेख यांनी भिवंडीत वरिष्ठ लिपिक, सहायक आयुक्त म्हणून कारभार चालवितात , असे किती आहेत असा सवाल करतानाच भिवंडी महापालिका बरबाद होत आहे, अशा स्थितीत नगरविकास विभागाची जबाबदारी काय असेही विचारले. प्रशांत बंब यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. योगेश सागर यांनी उपप्रश्न विचारताना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली.

Also Read: वाहन अपघात टाळण्यासाठी ऑटोमेटिक फिटनेस सेंटर्स – मुख्यमंत्री

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
मुंबई

उद्धव सेनेच्या मुंबईतील राजकीय ताकदीपुढे भाजपची शरणागती: सिनेट निवडणूक पुढे ढकलली

Twitter : @vivekbhavsar मुंबई : शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पाडून एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री केल्यानंतर देखील मुंबईत शिवसेनेचा पराभव