मुंबई : राज्यात गायी आणि गोवंश हत्या तसेच त्यांची अवैध विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी प्राणी रक्षण अधिनियमात तातडीने सुधारणा करावी, अशी मागणी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यावरून केली.
राज्याच्या विविध भागांमध्ये प्राण्यांच्या अवैध कत्तली वाढत आहेत. तसेच हत्येसाठी गोवंशांची राज्याबाहेर ने-आण होते. काही ठिकाणी पोलिसांनी तस्करी करताना जनावरे पकडल्यानंतर परस्परच त्यांची विक्री केली, असे प्रकारही घडल्याचे केळकर यांनी सभागृहात नमूद केले.
गायी आणि गोवंशांच्या पालन पोषणासाठी सरकारने अनुदान द्यावे, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.