X : @NalawadeAnant
मुंबई – बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर (Badlapur incident) झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. बदलापूरमधील ज्या शाळेत अत्यंत गंभीर व मन सुन्न करणारी घटना घडली ती शाळा भाजपा – राष्ट्रीय स्वयंसेवक (BJP-RSS) संघाशी संबंधित आहे. या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध नसल्याने येत्या २४ तारखेला महाभ्रष्ट युती सरकारविरोधात महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. जनतेने मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना केले.
बदलापूरच्या अत्याचाराच्या घटनेने राज्यातील महिला मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या बैठकीत जागावाटपावर (seat sharing discussions) होणारी चर्चा रद्द करून राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या (atrocities against women) वाढत्या घटना आणि महिला सुरक्षेवर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना बदलापूरच्या घटनेवर संताप व्यक्त करत पटोले म्हणाले की, भाजपा (BJP) युती सरकारला (Maha Yuti government) सत्तेची गुर्मी चढली आहे. महिला अत्याचारांचे प्रमाण राज्यात प्रचंड वाढलेले असतानाही सरकार आपल्यात मस्तीतच आहे. लाडकी बहिण (Ladki Bahin Yojna) म्हणून १५०० रुपये देण्यासाठी मोठ मोठे इव्हेंट केले जात आहेत, पण बहिणींची सुरक्षा केली जात नाही. राज्य सरकार, गृह खाते, शासन आहे की नाही अशी परिस्थिती आहे.
बदलापूरच्या घटनेत पोलीसांच्या (Badlapur police) भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून तक्रार दाखल करण्यास गेलेल्या पीडित मुलीच्या आईला तासनसात पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आले. त्यामुळे पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत, सरकार कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, अशा प्रश्नांची सरबत्ती पटोले यांनी सरकारवर केली.
दोषीवर कठोर कारवाई करावी यासाठी बदलापूरमध्ये लोकांनी मोठे जनआंदोलन केले, पण ते आंदोलनही दडपण्याचा प्रयत्न केला. राज्यात बाल अत्याचारांच्या घटनाही वाढल्या आहेत. भाजपा युती सरकार अत्यंत अकार्यक्षम, भ्रष्ट सरकार असल्याने सरकारला जागे करण्यासाठी २४ तारखेला महाराष्ट्र बंद ची (Maharashtra Band) हाक दिली असून या बंदमध्ये मविआमधील (MVA) सर्व घटक पक्ष सहभागी होणार आहेत. बदलापुरच्या पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी डॉक्टर, वकील, पालक यांनीही या बंदमध्ये सहभागी होऊन सरकारच्या विरोधात आवाज बुलंद करावा या आवाहनाचा पुनरुच्चारही पटोले यांनी केला.