महाराष्ट्र ताज्या बातम्या

नागपूर आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरमध्ये AI प्रशिक्षणासाठी ५ कोटींचा निधी

मुंबई: नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरमध्ये उभारण्यात येत असलेल्या बाबासाहेबांच्या ४० फूट उंच भव्य पुतळ्याचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण होईल, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा नियम १०५ अंतर्गत काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य डॉ. नितीन राऊत यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. सुमारे १४० कोटी रुपये खर्च करूनही या इमारतीची अवस्था डबघाईला का आली आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. येथे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहेर बसावे लागते, पाणी गळतीचे प्रश्न आहेत, यासाठी जबाबदार अधिकारी कोण, असा प्रश्नही त्यांनी केला.

यावेळी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी या भव्य वास्तूच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याची गरज असल्याचे सांगितले. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊन स्वतंत्र रोजगार निर्माण करता यावा, हे या केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट असावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

यावर उत्तर देताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी आणि युपीएससी अभ्यासासाठी आवश्यक सर्व पुस्तके उपलब्ध आहेत. केंद्राच्या दैनंदिन देखभाल खर्चासाठी ४ कोटी रुपये, तर वीज बिलासाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

तसेच विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रशिक्षण विभाग सुरू करण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली. कन्व्हेन्शन सेंटरसंदर्भातील सर्व आवश्यक सुविधांवर निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात