महाराष्ट्र ताज्या बातम्या

तटकरे कुटुंबीयांवरील टीका राष्ट्रवादी काँग्रेस खपवून घेणार नाही : राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे आणि महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्यावर झालेल्या वैयक्तिक टिकेचा राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी पत्रकार परिषद घेत तीव्र शब्दांत निषेध केला. “तटकरे कुटुंबीयांबद्दल वापरण्यात आलेली भाषा अशोभनीय, निंदनीय आणि महायुतीच्या धर्माला गालबोट लावणारी असल्याने अशा प्रकारची टिका कदापि सहन केली जाणार नाही,” असा इशारा राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी यावेळी दिला.

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे यांची नियुक्ती झाल्यानंतर शिंदे गटातील नेत्यांनी व जिल्ह्यातील शिंदे गटाच्या आमदारांनी विरोध दर्शवत तीव्र शब्दात टिका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना परांजपे म्हणाले, “महायुतीतील घटकपक्षांनी असंतोष असल्यास तो पक्षप्रमुखांकडे मांडला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी अशा टिकेने वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होतो.”

परांजपे यांनी शिवसेना नेते व मंत्री भरत गोगावले यांच्या आंदोलन शैलीवरही आक्षेप घेतला. “संविधानिक पदावर असून टायर जाळणे आणि रास्ता रोको करणे हे कायदा व सुव्यवस्थेला धक्का देणारे कृत्य आहे. मुख्यमंत्र्यांकडे गृहखाते असताना त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये,” असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

“अदिती तटकरे यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापासून मंत्रीपदापर्यंत उत्तम कामगिरी केलेली असून त्या नैसर्गिक आपत्तीवेळी स्वतः फिल्डवर उतरून लोकांची मदत करतात. त्यांनी ‘माझी लाडकी बहिण’ योजनेतून २ कोटी ३५ लाख महिलांच्या खात्यात थेट लाभ पोहोचवला. अशा कर्तृत्ववान महिलांवर अशोभनीय टिका खपवून घेतली जाणार नाही, “या आपल्या इशाऱ्याचा परांजपे यांनी पुनरुच्चार केला.

रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदांबाबत नाराजी व्यक्त झाली असली तरी “मुख्यमंत्री दावोसहून परतल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यावर तोडगा काढतील,” असे परांजपे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात