मुंबई ताज्या बातम्या

ठाणे जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने महाराष्ट्र निर्यात संमेलनाचे आयोजन

ठाणे : ठाणे जिल्हा उद्योग केंद्र यांच्यामार्फत दि. 7 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे येथे महाराष्ट्र निर्यात संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्यातील लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) यांना निर्यात संबंधित योजना व उपक्रमांबद्दल माहिती देणे तसेच निर्यात तज्ज्ञांच्या मदतीने त्यांना मार्गदर्शन व सहकार्य प्रदान करणे हे या संमेलनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

हे संमेलन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून विकास आयुक्त (उद्योग) आणि महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा सेल (MAITRI) चे अध्यक्ष, राज्याचे निर्यात आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह (भा.प्र.से.) उपस्थितांना मागदर्शन करणार आहेत.

Avatar

Meenal Gangurde

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका : राज ठाकरेंचा भाजपाला टोला

Twitter : @therajkaran पनवेल भारतीय जनता पक्षाने आपल्याला युतीची ऑफर दिली होती असा दावा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज