महाराष्ट्र ताज्या बातम्या

Prashant Damale: फेस्कॉम मुंबईच्या जेष्ठ नागरिक अधिवेशनात अभिनेते प्रशांत दामले यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’

मुंबई – महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) मुंबई प्रादेशिक विभागाचे ८ वे द्वैवार्षिक अधिवेशन येत्या ७ नोव्हेंबर २०२५ रोजी वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत पार पडणार आहे.

या अधिवेशनाचा विषय ‘ज्येष्ठ नागरिकांचे आनंदी जीवन व आरोग्य’ असा असून, महाराष्ट्रासह देशभरातील ज्येष्ठ मान्यवर नागरिक या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनानिमित्त विशेष स्मरणिकेचे प्रकाशन होणार असून त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक माहिती व उपयुक्त लेखन प्रकाशित करण्यात येईल.

या अधिवेशनात अभिनेते व विनोदी कलाकार प्रशांत दामले यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असते’ या नाटकाद्वारे घराघरात पोहोचलेले लोकप्रिय अभिनेते दामले यांनी २०१६ साली फेस्कॉम मुंबई प्रादेशिक विभागाला विविध उपक्रमांसाठी तब्बल ५ लाख रुपयांची देणगी दिली होती.

फेस्कॉम मुंबईचे अध्यक्ष सुरेश ईश्वर पोटे यांनी ही माहिती दिली.

Rajkaran Bureau

About Author

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात