X : @MilindMane70
महाड – मुंबईपासून जवळ असलेल्या रायगड (Raigad) पावसाळ्यात होणारी ३००० मिलिमीटर पर्यंतची पर्जन्यवृष्टी पाहता या ठिकाणी ५४ जलविद्युत प्रकल्प (Hydro Power Project) कार्यान्वित होऊ शकतात. मात्र शासन दरबारी पाठपुरावा करण्याची मानसिकता जिल्ह्यातील सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधींमध्ये नसल्याने मागील दहा वर्षापासून प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पांना अद्याप हिरवा झेंडा मिळालेला नाही.
रायगड जिल्ह्याचे क्षेत्रफळ ७१६२ चौरस किलोमीटर आहे. राज्याच्या ७२० किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्यापैकी रायगड जिल्ह्याला २४० किलोमीटर लांबीचा किनारा लाभला आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ३१४२.८३ मिलिमीटर आहे. परंतु, सन २००५ मधील पावसाची सरासरी ३९१३ मिलिमीटर होती.
जिल्ह्यात जलसंपदा विभागाचे बाळ गंगाधर हा एक मोठा प्रकल्प, आठ मध्यम प्रकल्प, १६ लघु प्रकल्प, १०१ ते २५० हेक्टर मधील ५२ प्रकल्प, ० ते १०० हेक्टर मधील १६ प्रकल्प, ८० पाझर तलाव, कोकण पद्धतीचे बंधारे १३, साठवण तलाव 45 असे प्रकल्प कार्यान्वित आहेत.
रायगड जिल्ह्यात उल्हास- खोरे, पोशीर व शिलार, यामध्ये पूर्ण कर्जत तालुका येतो. जिल्ह्यातील ९.९१ % भाग उल्हास खोऱ्यामध्ये येतो. एकूण ७,०८,७६३ हेक्टर क्षेत्र उल्हास खोऱ्यात येते. सावित्री खोरे – काळ, गांधारी, कामठी, चोळई, नागेश्वरी यामध्ये महाड तालुका, पूर्ण माणगाव तालुका, बहुतांशी पोलादपूर, श्रीवर्धन, रोहे तालुका, अंशत: समाविष्ट होतात. रायगड जिल्ह्यातील ३६.५९ टक्के भाग (२६,१६,९१७ हेक्टर क्षेत्र) सावित्री खोऱ्यात येते.
पाताळगंगा खोऱ्यामध्ये पनवेल, उरण तालुका, पूर्ण खानापूर, पेण तालुका येतो. जिल्ह्यातील १३.६८ टक्के भाग पाताळगंगा खोऱ्यात येतो. आंबा खोऱ्यात अलिबाग व सुधागड तालुका बहुतांशी, खालापूर, पेण, रोहा तालुका अंशत: येतो. यामध्ये जिल्ह्यातील १०.७७ टक्के क्षेत्र (७,७०,२७० हेक्टर क्षेत्र) आंबा खोऱ्यात येते. कुंडलिका नदीच्या खोऱ्यात अलिबाग, माणगाव, रोहा तालुका बहुतांशी, सुधागड व मुरुड तालुके पूर्णतः येतात. यामध्ये जिल्ह्यातील १२.०१ टक्के भाग (८,५८,९५५ हेक्टर क्षेत्र) कुंडलिका खोऱ्यात येते.
जिल्ह्यात उल्हास, पाताळगंगा, आंबा, कुंडलिका व सावित्री या पाच प्रमुख नद्या आहेत. जिल्ह्यात 1909 गावे असून 43 गावे आदिवासी क्षेत्रामध्ये समाविष्ट केलेली आहेत, या 43 गावांचे क्षेत्रफळ 300 चौरस किलोमीटर आहे.
रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात रखडलेले जलविद्युत प्रकल्प पुढील प्रमाणे:
१. काळ, तालुका महाड – १५ मेगावॅट, २. कुंभे, माणगाव तालुका – १० मेगावॅट
खाजगीकरण अंतर्गत प्रस्ताविक ५२ प्रकल्पांची नावे पुढीलप्रमाणे:
१. कुंडलिका, तालुका रोहा : ४.५० मेगावॅट (करारनामा झालेला आहे). २. हेटवणे, तालुका पेण : ५०० मेगावॅट.
३. गांजवणे, तालुका पोलादपूर : ६.५० मेगावॅट, ४. गुगळशी, तालुका महाड : ८.०० मेगावॅट,
५. भालगाव, तालुका मुरुड : २.०० मेगावॅट, ६. कसबे शिवतर, तालुका महाड : ५.०० मेगावॅट,
७. कदमपाडा, तालुका महाड : २.५० मेगावॅट, ८. कळवट, तालुका महाड : ४.०० मेगावॅट,
९. नागशेत, तालुका महाड : २.०० मेगावॅट, १०. भांबुर्डा, तालुका महाड : ९.६५ मेगावॅट,
११. ऊनर्ज, तालुका महाड : १.५० मेगावॅट, १२. दीपट, तालुका महाड : ७.०० मेगावॅट,
१३. बोरघर, तालुका महाड : २.०० मेगावॅट, १४. ठाकूरवाडी, तालुका कर्जत : १.५० मेगावॅट,
१५. आरकवाडी, तालुका कर्जत : १.२५ मेगावॅट, १६. घोणसे, तालुका म्हशळा : २.०० मेगावॅट,
१७. पांगळोली, तालुका म्हसळा : १.०० मेगावॅट, १८. कोंढाणे, तालुका माणगाव : २.०० मेगा व्हॅट,
१९. गांधारी, तालुका महाड : ४००.०० मेगावॅट, २०. नसरापूर, जिल्हा रायगड : ०.९० मेगावॅट,
२१. धामणी, किल्ला रायगड : ११.०० मेगावॅट, २२. आंबेघर, रायगड : १०.०० मेगावॅट,
२३. भाग्याची वाडी, तालुका कर्जत : ०.२० मेगावॅट, २४. बोंडशेत, तालुका कर्जत : ०.२० मेगावॅट,
२५. मार्गवाडी, तालुका कर्जत : ०.४५ मेगावॅट, २६. बिडीसवाडी, तालुका कर्जत : ०.२० मेगावॅट,
२७. सालपे, तालुका कर्जत : ०.२० मेगावॅट, २८. धाक, तालुका कर्जत : ०.२० मेगावॅट,
२९. धनगरवाडी, तालुका सुधागड : ०.२० मेगावॅट (या प्रकल्पाचा करारनामा झालेला आहे)
३०. दुधानी, तालुका पनवेल : ०.२० मेगावॅट, ३१. दासगाव, तालुका महाड : ०.२० मेगावॅट,
३२. गोकुळवाडी, रायगड : १.०० मेगावॅट, ३३. नारवेड, रायगड : १.०० मेगावॅट,
३४. घोटी, रायगड : ०.५० मेगावॅट, ३५. लामशेवाडी, रायगड : ०.५० मेगावॅट,
३६. मगरूम, रायगड : ०.७५ मेगावॅट, ३७. गडबड, रायगड : ६.०० मेगावॅट,
३८. सय्यदगिरी, रायगड : ९.०० मेगावॅट, ३९. पाचापूर, रायगड : १.०० मेगावॅट,
४०. खांडपोली, रायगड : २.५० मेगावॅट, ४१. राजेवाडी, रायगड : २.५० मेगावॅट,
४२. कारवनी, रायगड : १.०० मेगावॅट, ४३. केळेवाडी, रायगड : २.५० मेगावॅट,
४४. सुतारवाडी रायगड : ७.०० मेगावॅट, ४५. शरातेवाडी, रायगड : ७.०० मेगावॅट,
४६. सोंडेवाडी, रायगड : ३.५० मेगावॅट, ४७. पोटेवाडी, रायगड : १.०० मेगावॅट,
४८. पितळवाडी, रायगड : ७.५० मेगावॅट, ४९. विन्हेरे, रायगड : १.०० मेगावॅट,
५०. गरतेवाडी, रायगड : ६.०० मेगावॅट, ५१. गोमाशी, रायगड : ११.०० मेगावॅट
या ठिकाणावरून पावसाळ्यात नदीद्वारे वाहणाऱ्या जोरदार प्रवाहामुळे व काही ठिकाणी असणाऱ्या पाझर तलाव व साठवण तलावातून व लघुपाटबंधारे प्रकल्पातून शेतीला सोडणाऱ्या पाण्याद्वारे वीज उत्पन्न होऊ शकते.