महाराष्ट्र ताज्या बातम्या

रायगड पुन्हा अंधारात! केंद्र सरकारच्या तिजोरीत खडखडाट?

फक्त ₹५०,००० वीज बिल थकले – पुरातत्व खात्याचा बेजबाबदारपणा; वीज महामंडळाने राखला “राजाचा मान’

महाड : राज्यात दिवाळीचा जल्लोष सुरू असताना, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणारा किल्ले रायगड मात्र अंधारात बुडाला! दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दीपोत्सवाच्या वेळी रायगडावर वीजपुरवठा खंडित झाला — कारण गेल्या नऊ महिन्यांपासून तब्बल ₹५०,००० वीज बिल थकले आहे!

आता प्रश्न असा — केंद्र सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे का? राज्य आणि केंद्रातील सत्ताधारी महाराजांच्या नावाने राजकारण करतात, उद्घाटनांपासून शपथविधीपर्यंत “जय शिवाजी, जय भवानी”चा जयघोष करतात; पण महाराजांच्या राजधानीवरील वीज बिल भरण्याइतकं भान मात्र सरकारला नाही!

पुरातत्व खात्याचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. रायगडावरील सौर दिवे निकृष्ट दर्जाचे, देखभाल शून्य, आणि आता वीज बिलही थकलेले. तरीही महाड वीज विभागाने “राजाचा सन्मान” राखत — किल्ल्यावरचा वीजपुरवठा बंद केला नाही.

📜 थकबाकीचा तपशील:
1️⃣ रायगड बुकिंग ऑफिस – ₹6,588
2️⃣ जगदीश्वर मंदिर – ₹11,708
3️⃣ राज दरबार – ₹23,323
एकूण थकबाकी – ₹41,619.94

दरवर्षी “शिवचैतन्य सोहळा” आणि दीपोत्सवाच्या नावाने मंत्री-नेते छायाचित्र काढून सोशल मीडियावर पोस्ट करत असतात, पण प्रत्यक्षात रायगडचा दीप पुन्हा एकदा सरकारी अंधारात हरवला आहे.

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

1 Comment

  1. राजकारण Impact : अखेर पुरातत्व विभाग नरमले; दंडासह RS 56,510 रक्कम अदा

    October 28, 2025

    […] Also Read: रायगड पुन्हा अंधारात! केंद्र सरका… […]

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात