१५ दिवसांत उपाययोजना करण्याचे आश्वासन
औरंगाबाद : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सतत होणारे अपघात थांबवण्यासाठी आज पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) पंकज अतुलकर, दौलताबाद पोलीस स्टेशनच्या निरीक्षक रेखा लोंढे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि माळीवाडा ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक पार पडली.
या बैठकीत अपघात रोखण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीतील ठळक निर्णय : महामार्गावरील खड्डे दोन दिवसांच्या आत बुजवणे, अपघात टाळण्यासाठी अनधिकृत दुभाजक बंद करणे, चोरी टाळण्यासाठी रात्री उड्डाणपुलावरील व पुलाखाली पथदिवे सुरू ठेवणे, गावातील चौकात सोलर सिग्नल बसवणे, वाहनांच्या वेगमर्यादेसाठी रॅम्बलिंग स्ट्रिप (ब्रेकर) बसवणे,
महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडचे सिमेंट काँक्रीट करणे, हलगर्जी करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करणे, पुलाखाली दिशादर्शक फलक लावणे.
बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी सर्व मागण्यांना मान्यता देत १५ दिवसांच्या आत उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन पोलिस उपायुक्त व ग्रामस्थांना दिले.
* * * The crypto train is moving - hop on with free BTC: https://maharishidigitalhub.com/index.php?nhabg4 * * * hs=4f5d4cd9c2c7534d3a51d0b870f0f736* ххх*
September 19, 20253u6g1f