मुंबई – रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या मुंबई प्रदेश उपाध्यक्षपदी सौ. प्रितमाला पुलकेशी साळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार झाली. महिला आघाडीच्या मुंबई अध्यक्षा उषाताई रामलु यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
सौ. साळवी या दिवंगत नेते व माजी मंत्री प्रितमकुमार शेगावकर यांच्या कन्या आहेत. लहानपणापासूनच त्यांना रिपब्लिकन चळवळीचा वारसा लाभला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल अनेकांनी अभिनंदन केले असून, पक्षाच्या महिला आघाडीच्या माध्यमातून पक्षवाढीसाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.