ताज्या बातम्या

शुभदा चौकर यांना नारायण आठवले पुरस्कार

X: @therajkaran

मुंबई : गोव्यातील ‘लोकविश्वास प्रतिष्ठान’तर्फे दिला जाणारा यंदाचा ‘नारायण आठवले स्मृती पुरस्कार’ शुभदा चौकर यांना जाहीर झाला असून तो रविवारी, २८ एप्रिल रोजी मुंबईत प्रदान केला जाईल.

ज्येष्ठ संपादक आणि लेखक नारायण आठवले यांनी विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या लोकविश्वास प्रतिष्ठानची स्थापना गोव्यात केली होती. त्यांच्या निधनानंतर संस्थेने आठवले यांच्या नावाने पत्रकारितेचा पुरस्कार सुरू केला आहे. तो ‘वयम’च्या संपादक चौकर यांना रविवारी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर व ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये प्रदान केला जाईल.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका : राज ठाकरेंचा भाजपाला टोला

Twitter : @therajkaran पनवेल भारतीय जनता पक्षाने आपल्याला युतीची ऑफर दिली होती असा दावा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज