उबाठाकडून रॅलीसह जोरदार शक्तीप्रदर्शन
महाड–स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
५७ करंजाडी जिल्हा परिषद गटातून
गिरगावचे सरपंच व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा समन्वयक
सोमनाथ दिगंबर ओझर्डे
यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
त्याचप्रमाणे
११४ विन्हेरे पंचायत समिती गणातून
सुषमा चंद्रकांत मोरे
यांनी उमेदवारी अर्ज सादर केला.
दोन्ही उमेदवारांनी शिरगाव नाक्यापासून ढोल-ताशांच्या गजरात काढलेल्या भव्य रॅलीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा महाड प्रांत कार्यालयात आपले अर्ज सादर केले.
महाड शहरात उबाठाचा जल्लोष
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काढलेल्या रॅलीमुळे महाड शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मोठा जल्लोष पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत वातावरण पूर्णपणे भगवे केले.

यावेळी बोलताना
शिरगाव गावचे सरपंच, उपजिल्हा समन्वयक आणि
५७ करंजाडी जि.प. गटाचे उमेदवार सोमनाथ दिगंबर ओझर्डे म्हणाले,
“बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका अखेर होत आहेत. या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रत्येक शिवसैनिक सज्ज झाला आहे. या मतदारसंघात आम्हाला पोषक वातावरण असून येणाऱ्या निवडणुकीत आमचा विजय निश्चित आहे.”

