महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sulzer Pumps: नवी मुंबईच्या सुल्झर पंप्स इंडिया कंपनीत ऐतिहासिक त्रैवार्षिक वेतनवाढीचा करार

नवी मुंबई – दिघा येथील बहुराष्ट्रीय सुल्झर पंप्स इंडिया (Sulzer Pumps) प्रा. लि. कंपनी आणि सुल्झर पंप्स इंडिया एम्प्लॉईस युनियन यांच्यात सोमवार, ४ ऑगस्ट रोजी त्रैवार्षिक वेतनवाढीचा करार संपन्न झाला. सन २०२२ मध्ये ₹२८,०००/- इतकी वाढ मिळविल्यानंतर यंदा सरासरी ₹२९,५००/- ची वेतनवाढ निश्चित करण्यात आली आहे. या कराराचा कालावधी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२७ असा तीन वर्षांचा आहे. पहिल्या वर्षी ₹११,०००/-, दुसऱ्या वर्षी ₹९,५००/-, आणि तिसऱ्या वर्षी ₹९,०००/- इतकी वाढ करण्यात आली असून, त्याचे ५० टक्के घटक (Basic + FDA) आणि ५० टक्के इतर भत्त्यांमध्ये वाटप केले जाणार आहे.

या करारांतर्गत कामगारांसाठी प्रथमच ₹७ लाखाची ग्रुप मेडिक्लेम पॉलिसी (Medical Claims) लागू करण्यात आली आहे. तसेच पालकांसाठी स्वतंत्र ₹३ लाखाची मेडिक्लेम पॉलिसीची सोय देखील करण्यात आली असून, त्याचा हप्ता गरजूंनी भरायचा आहे. जास्तीत जास्त कामगार या पॉलिसीचा लाभ घेतल्यास हप्ताही कमी होण्याची शक्यता आहे. ही पॉलिसी कामगाराला पहिल्या दिवसापासून लागू होईल आणि निवृत्तीनंतरही कायम राहील, मात्र त्यासाठी हप्ता स्वतः भरावा लागेल.

दिवाळी भेटवस्तूसाठी एकूण ₹२६,०००/- इतकी रक्कम निश्चित करण्यात आली असून, २०२६ आणि २०२७ साठी ती उत्पादनवाढीच्या आधारे पुन्हा ठरविण्यात येईल. कंपनी प्रत्येक युनियन सभासदासाठी प्रतिवर्षी ₹६,४००/- सहल अनुदान युनियन फंडात जमा करेल. फिक्स बोनसमध्ये (Fixed Bonus) दरवर्षी ₹३,६००/- इतकी वाढ करण्यात आली असून, एक्स ग्रेशिया रक्कम EBIT च्या १२ टक्के दराने कंपनीच्या नफा-तोटा अहवालावर आधारित वाटप केली जाईल. प्रवास भत्त्यामध्ये (TA) दरवर्षी ₹३,०००/- इतकी वाढ करण्यात आली आहे.

या वेतनवाढीच्या करारावेळी कंपनीकडून मॅनेजिंग डायरेक्टर सुजल शहा, HR प्रमुख मारुती नंदन, VP जितेंद्र सावंत, HR ER सुनील चक्कनकर, जनरल मॅनेजर सौ. अलका सिंग, HR DGM संतोष सातोस्कर, HR IR सुयश जैस्वाल हे उपस्थित होते. युनियनकडून अध्यक्ष रुपेश पवार, उपाध्यक्ष मयूर उपाध्ये, जनरल सेक्रेटरी प्रमोद लोटणकर, खजिनदार माधव सकपाळ, सेक्रेटरी किसन भोर, उपसेक्रेटरी केतन कांगणे, आणि कमिटी सदस्य संतोष मांजरेकर, संजय भारती, सचिन थोरात हे सहभागी झाले.

करारानंतर ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळून कामगारांनी आनंद साजरा केला आणि युनियन कमिटी व व्यवस्थापनाचे आभार मानले.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात