महाराष्ट्र ताज्या बातम्या

येत्या बुधवारी सुपरमून दर्शन!

ठाणे: येत्या बुधवारी, ५ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री आकाशात एक मनमोहक खगोलीय दृश्य पाहायला मिळणार आहे. या दिवशी सुपरमूनचे दर्शन होणार असल्याची माहिती पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आल्यास त्याचे बिंब नेहमीपेक्षा मोठे आणि अधिक तेजस्वी दिसते. यालाच सुपरमून असे म्हणतात. बुधवारी रात्री आपणास असा तेजस्वी व नेत्रदीपक चंद्र दिसणार आहे.

साधारणतः चंद्र पृथ्वीपासून ३,८४,००० कि.मी. अंतरावर असतो. परंतु, या रात्री तो पृथ्वीपासून फक्त ३,५६,८३४ कि.मी. अंतरावर येणार आहे. त्यामुळे चांद्रबिंब साधारणतः १३ टक्के मोठे आणि ३० टक्के अधिक तेजस्वी दिसेल.

याउलट, पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीपासून अधिक दूर असल्यास चंद्र लहान आणि कमी प्रकाशमान दिसतो — याला मायक्रोमून म्हणतात.

या विशेष रात्री सायंकाळी ५.४४ वाजता चंद्र पूर्व दिशेला उगवेल आणि संपूर्ण रात्र आकाशात दर्शन देईल.

या पुढील सुपरमून ४ डिसेंबर रोजी दत्तजयंतीच्या रात्री पाहायला मिळेल, असेही सोमण यांनी सांगितले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात