ताज्या बातम्या मुंबई

मुंबई जनता दल (सेक्युलर) अध्यक्षपदी सुरेंद्रकुमार बाजपेयी, प्रभाकर नारकरांना राज्यात नवी जबाबदारी

Surendrakumar Bajpeyi and Prabhakar Narkar appointed to key positions in Janata Dal Secular Mumbai and Maharashtra

मुंबई : जनता दल (सेक्युलर) चे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या सल्ल्यानुसार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी सुरेंद्रकुमार बाजपेयी यांची मुंबई जनता दल (सेक्युलर) च्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

बाजपेयी यांनी यापूर्वी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून काम पाहिले असून, आता त्यांच्यावर मुंबईतील पक्ष संघटनेच्या बळकटीकरणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ते व्यवसायाने संगणक अभियंता आणि वकील असून, त्यांच्या तांत्रिक व कायदेशीर अनुभवाचा पक्षाला उपयोग होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी सांगितले की, पक्षाची संघटनात्मक बांधणी तळागाळापर्यंत मजबूत करण्याच्या रणनीतीनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.

नियुक्तीनंतर सुरेंद्रकुमार बाजपेयी यांनी राष्ट्रीय आणि प्रदेश नेतृत्वाचे आभार मानत मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याची ग्वाही दिली. “सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या नागरी समस्यांवर लक्ष केंद्रित करून मुंबईत जनता दल (सेक्युलर) ला एक पर्यायी राजकीय शक्ती म्हणून उभे करण्याचा आमचा प्रयत्न असेल,” असे त्यांनी सांगितले.

याचवेळी, हाजी सलीम भट्टी यांची मुंबई जनता दल (सेक्युलर) च्या प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याची भूमिका मांडली.

मुंबई जनता दल (सेक्युलर) चे माजी अध्यक्ष प्रभाकर नारकर यांची महाराष्ट्र जनता दल (सेक्युलर) च्या कार्याध्यक्ष व प्रधान सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

योगेश त्रिवेदी

योगेश त्रिवेदी

About Author

योगेश त्रिवेदी (Yogesh Trivedi) हे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत. त्यांनी सामना या प्रखर हिंदुत्ववादी आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या मराठी वृत्तपत्रात सर्वाधिक काळ पत्रकारिता केली.

4 Comments

  1. Kerri Veney

    April 8, 2026

    Good write-up, I am regular visitor of one’s blog, maintain up the excellent operate, and It’s going to be a regular visitor for a lengthy time.

  2. gelatin trick recipe

    April 8, 2026

    An impressive share, I simply given this onto a colleague who was doing a little evaluation on this. And he in actual fact bought me breakfast as a result of I found it for him.. smile. So let me reword that: Thnx for the deal with! However yeah Thnkx for spending the time to discuss this, I feel strongly about it and love reading more on this topic. If potential, as you turn out to be experience, would you mind updating your weblog with extra details? It’s highly useful for me. Huge thumb up for this blog publish!

  3. it recycling

    April 8, 2026

    Hey, you used to write fantastic, but the last few posts have been kinda boring… I miss your great writings. Past several posts are just a little out of track! come on!

  4. Gustavo Kriske

    April 8, 2026

    What i do not realize is actually how you are no longer really a lot more neatly-liked than you may be right now. You are so intelligent. You recognize therefore considerably with regards to this matter, produced me individually imagine it from a lot of numerous angles. Its like women and men don’t seem to be fascinated until it is one thing to do with Girl gaga! Your individual stuffs outstanding. At all times care for it up!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका : राज ठाकरेंचा भाजपाला टोला

Twitter : @therajkaran पनवेल भारतीय जनता पक्षाने आपल्याला युतीची ऑफर दिली होती असा दावा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज