सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्यांवर चौकशी पुन्हा सुरू होणार; सहकार मंत्र्यांचे विधान परिषदेत आश्वासन
मुंबई: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्यांच्या संदर्भात सुरू असलेल्या चौकशीवरील स्थगिती उठवण्यात आली असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सहकार मंत्र्यांनी विधान परिषदेत आश्वासन दिले. आमदार सदाभाऊ खोत यांनी या घोटाळ्याच्या मुद्द्यावर लक्षवेधी सूचना मांडली होती. खोत यांनी बँकेच्या संचालक मंडळाच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराची चौकशी कलम ८८ अंतर्गत त्वरित पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. […]