महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यात प्राध्यापक भरतीला मंजुरी – नवीन कार्यपद्धती लागू : मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई – राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये प्राध्यापक भरतीला मान्यता देण्यात आली असून, भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष करण्यासाठी नवीन कार्यपद्धती लागू करण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना केली. राज्यपाल तथा कुलपती यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांसाठी गुणांकन पद्धती निश्चित करण्यात आली आहे. […]