विधानसभेत बोलताना विजय वडेट्टीवार. रामटेक देवस्थान विधेयकावर चर्चा करताना विरोधकांनी राजकीय व्यक्तींना विश्वस्त न नेमण्याची मागणी केली. महाराष्ट्र ताज्या बातम्या

रामटेक देवस्थान विधेयकावर विधानसभेत गदारोळ; ‘राजकीय व्यक्ती विश्वस्त नकोत’, विरोधकांची मागणी

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत श्रीराम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था, रामटेक विधेयक २०२६ वरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. या विश्वस्त मंडळात चांगली आणि प्रामाणिक माणसे घ्यावीत, राम मंदिराची दानपेटी लुटणाऱ्यांना घेऊ नये, राजकीय व्यक्तींना विश्वस्त नेमू नये, अशा मागण्या करत विरोधकांनी शासनाला धारेवर धरले. विधेयकावर चर्चा सुरू असताना सत्ताधारी बाकांवरून शेरेबाजी झाल्याने […]

विधानसभेत नाशिक रिंगरोड प्रकल्पाच्या भूसंपादनातील कथित अनियमिततेचा मुद्दा उपस्थित करताना काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार. महाराष्ट्र ताज्या बातम्या

नाशिक रिंगरोड भूसंपादनाची चौकशी; विजय वडेट्टीवारांच्या आरोपांनंतर सरकारकडून १५ दिवसांत अहवालाचे आदेश

मुंबई : आगामी नाशिक कुंभमेळ्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या रिंगरोड प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेवर गुरुवारी विधानसभेत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रकल्पाच्या मार्गिकेत कथित बदल करून विशिष्ट व्यक्ती आणि कंपन्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. वडेट्टीवार यांनी सभागृहात सांगितले की, प्रारंभीच्या आराखड्यात नसलेले काही सर्व्हे क्रमांक नंतर समाविष्ट […]

विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत आरटीओतील कथित वसुली रॅकेटचा मुद्दा उपस्थित केला महाराष्ट्र ताज्या बातम्या

आरटीओतील कथित ‘वसुली साम्राज्या’चा विधानसभेत स्फोट; एसआयटी चौकशीची घोषणा

वडेट्टीवारांच्या कथित ऑडिओ क्लिप्सनंतर सरकारची तातडीची कारवाई; महिनाभरात अहवाल मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंगळवारी परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा चांगलाच गाजला. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत आरटीओ विभागात अनेक वर्षांपासून संघटित स्वरूपात कथित ‘वसुली रॅकेट’ सुरू असल्याचा गंभीर आरोप केला. यासंदर्भात काही अधिकाऱ्यांच्या संभाषणाच्या कथित ऑडिओ क्लिप्सही त्यांनी सभागृहात सादर केल्याने […]

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक विधानसभेत अनधिकृत बाईक टॅक्सींवरील कारवाई आणि कर आकारणीबाबत माहिती देताना महाराष्ट्र ताज्या बातम्या

अनधिकृत बाईक टॅक्सींवर कर आकारणी; परिवहन विभागातील भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी होणार  

राज्यात चार ते साडेचार लाख अनधिकृत बाईक-टॅक्सी चालक कार्यरत असून, यापुढे अशा बाईक-टॅक्सींवर प्रतिदिन पाच रुपये आणि प्रत्येक फेरीमागे दोन रुपये कर आकारण्यात येणार आहे. परिवहन विभागातील भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.   मुंबई, मंगळवार : राज्यात सध्या तब्बल चार ते साडेचार लाख अनधिकृत बाईक-टॅक्सी चालक कार्यरत असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप […]