महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यातील २४६ नगरपरिषद व ४२ नगरपंचायतींसाठी १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार सज्ज

मुंबई — स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी होणार असून राज्यातील एकूण १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकांसाठी राज्यभरात १३,३५५ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. मतदान प्रक्रियेसाठी १३,७२६ कंट्रोल युनिट्स आणि २७,४५२ बॅलेट युनिट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. […]