महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुरलीधरन, विजया रहाटकर यांना भाजपची उमेदवारी?; पार्थ पवारांनाही राज्यसभेची लॉटरी?

X : @vivekbhavsar मुंबई: राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागेसाठी २७ फेब्रुवारी रोजी होणारी निवडणूक बिनविरोध होण्याच्या हालचाली महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे. सहा पैकी पाच जागा महायुती जिंकेल तर एक जागा महाविकास आघाडी जिंकेल, असे स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही केले आहे. विधानसभेचे सदस्य राज्यसभेसाठी मतदान करतात. सध्या विधानसभेचे २८६ सदस्य आहेत. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कृषी विभागाच्या पुरस्काराच्या रकमेत चौपट वाढ, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

मुंबई राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित उल्लेखनीय कार्याकरिता देण्यात येणाऱ्या विविध पुरस्करांच्या रकमेत चौपट वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. ते म्हणाले, शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये अतिउल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेस कृषी विभागामार्फत दरवर्षी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी वेळोवेळी कृषी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांचा नवा पक्ष कोणता? EC कडून आज दुपारी 3 वाजेपर्यंत 3 पर्याय सूचवण्याचे निर्देश

मुंबई निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला दिल्याचा निकाल जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. आयोगाने शरद पवारांना त्यांच्या गटासाठी नवं नाव आणि निवडणूक चिन्ह देण्यासाठी ३ पर्याय सुचवण्याचे निर्देश दिले आहेत. आज बुधवारी ३ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे शरद पवारांचा नवा पक्ष आणि नवं चिन्ह […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘महाशक्ती’ची नारायणी सेना त्यांच्या बाजूने असली तरी…; महाभारताचा दाखला देत रोहित पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल

मुंबई केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालनंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह दिले आहे. यानंतर शरद पवार गटातील नेत्यांकडून या निर्णयावर विरोध दर्शविला जात आहे. शरद पवार जिथं तोच पक्ष अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून दिली जात आहे. यावर रोहित पवारांनी एक […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

शरद पवार गटाचा मोठा पराभव, राष्ट्रवादी पक्ष अन् घड्याळ अजित पवारांकडे

मुंबई अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या निकालात शरद पवार गटाचा मोठा पराभव झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह देण्यात आलं आहे. यापुढे शरद पवार गटाला उद्यापर्यंत नवं नाव आणि चिन्हाचा प्रस्ताव निवडणूक आयोगापुढे सादर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

12 ते 19 फेब्रुवारीला राष्ट्रवादी अजित पवार गटाचा ‘स्वराज्य सप्ताह’

मुंबई छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी अजित पवार गटाच्यावतीने राज्यभरात दिनांक १२ ते १९ फेब्रुवारीपर्यंत ‘स्वराज्य सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आले असून १२ फेब्रुवारी रोजी गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ तर समारोप किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे […]

विधानसभेत बोलताना विजय वडेट्टीवार. रामटेक देवस्थान विधेयकावर चर्चा करताना विरोधकांनी राजकीय व्यक्तींना विश्वस्त न नेमण्याची मागणी केली. ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘महायुतीचा 155 कोटींचा मोबाइल घोटाळा, सरकारमध्ये दोन अलिबाबा आणि ऐंशी चोर’, वडेट्टीवारांनी सरकारला घेरलं

मुंबई ‘महायुती सरकारची भूक दिवसेंदिवस वाढत आहे. सत्तेसाठी पैसा आणि पैशातून सत्ता हे या सरकारचे ब्रीद आहे. राज्यात आठ हजार कोटींचा अँम्बुलन्स घोटाळा गाजतो आहे. तोपर्यंत सरकारने मोबाईल घोटाळा केला आहे. मर्जीतल्या कंपनीकडून 155 कोटी रूपयांची मोबाइल खरेदी करण्याचा सरकारचा इरादा आहे. त्याचबरोबर निवडणुका डोळ्यासमोर मतं मिळवण्यासाठी अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना सरकार साड्या वाटणार आहे. हा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘निवडणुकांआधी महायुतीत गुंडांची भरती जोरात’; शिंदे, पवार यांचे फोटो ट्विट करीत वडेट्टीवारांची जोरदार टीका

मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा फोटो समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. आतापर्यंत एकनाथ शिंदेंचे सुपूत्र श्रीकांत शिंदेंचा फोटो कुख्यात गुंड हेमंत दाभेकर, अजित पवारांचा फोटो गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला असिफ मुहमंद इक्बाल शेख आणि अजित पवारांचे सुपूत्र पार्थ पवार यांचा फोटो गुंड गजा मारणे याच्यासोबत समोर आला होता. काही दिवसांपूर्वी भाजप […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘नाटकी लोकांना किंमत देत नाही तर खुलासा कशाला?’ अजित पवार अन् जितेंद्र आव्हाडांमध्ये ट्विटरवॉर

अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये ट्विटरवॉर सुरू असल्याचं दिसत आहे. बारामतीत अजित पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना नाव न घेता शरद पवारांवर टीका केली होती. त्यावरुन दोघांमध्ये ट्विटरवॉर सुरू झालं आहे. बारामतीत अजित पवार म्हणाले. ‘लोकसभा निवडणुकीसाठी मी लवकरच उमेदवार जाहीर करणार आहे. त्यावेळी काही लोक येतील भावनिक साद घालतील, ही शेवटची निवडणूक आहे सांगतील. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

पुण्यातील कुख्यात गुंड; खून, दरोड्याच्या आरोपीसह मुख्यमंत्र्यांचा फोटो, संजय राऊतांचं ट्विट करत हल्लाबोल

पुणे: मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने शुभेच्छा दिल्याचा फोटो सोमवारी समोर आल्याने खळबळ उडाली होती. आधीच शिंदे गटाच्या शहराध्यक्षावर गोळीबार करणारा गणपत गायकवाड याने एकनाथ शिंदेंवर गुंडशाहीला खतपाणी घातल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर अजित पवार यांची पिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला असिफ मुहमंद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढीची भेट […]