ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राज्यातील कंत्राटदारांना ‘राजकीय भाईगिरी’चा फटका, मारहाणीमुळे कामबंदचा इशारा, वडेट्टीवारांची राज्य सरकारवर टीका

मुंबई राज्य अभियंता संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांना एक आवाहन करणारं एक पत्र लिहिलं आहे. यात कंत्राटदारांना गावपातळीवर होणाऱ्या भाईगिरीच्या त्रासाचा उल्लेख करण्यात आला आहे. अनेक राजकीय मंडळी पैशांसाठी मारहाण करीत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये हा प्रकार वाढण्याचं या पत्रकात दिलं आहे. यावर वेळीच कारवाई केली नाही तर फेब्रुवारी-मार्चमध्ये […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राज्यात शिंदे-फडणवीस-पवारांचे गुंडाराज, कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा, पोलिसांवर सरकारचा प्रचंड दबाव; पटोलेंचा हल्लाबोल

मुंबई कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाडांनी भरदिवसा शिवसेना शिंदे गटाचे कल्याणचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याच्या वृत्ताने राज्यात खळबळ उडाली आहे. भाजप आमदाराने महेश गायकवाड यांच्यावर तब्बल सहा गोळ्या झाडल्या. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटू लागले असून हे राज्याच्या गृहमंत्र्यांचं अपयश असल्याचा आरोप केला जात आहे. ‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र शोध बातमी

Impact : भुजबळ भाजपच्या वाटेवर? ‘द राजकारण’नंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचा दावा

मुंबई ‘द राजकारण’ ने काल १ फेब्रुवारी रोजी छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याला दुजोरा देणारं ट्विट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं आहे. त्यामुळे छगन भुजबळ पुढील लोकसभा निवडणूक भाजपमधून लढवणार असल्याच्या राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. मंत्री छगन भुजबळ हे अजित पवार गटात अस्वस्थ असल्याचं सांगितलं जात आहे. मराठा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप? चर्चेत असलेले भुजबळ नवा राजकीय बॉम्ब टाकणार!

मुंबईX : @MeenalGangurde8 आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मोठे फेरबदल होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. मात्र लोकसभा निवडणूक आणि पक्षांतर्गत अस्वस्थतेमुळे काही उमेदवार दुसऱ्या पक्षाकडून निवडणूक लढवू शकतात, असेही आडाखे बांधले जात आहे. यात छगन भुजबळांबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. मंत्री छगन भुजबळ हे अजित पवार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय विश्लेषण

राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा, महाराष्ट्रातून त्या 6 जागांवर कोणाची वर्णी?

मुंबई राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून २७ फेब्रुवारी रोजी १५ राज्यात निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातून सहा जागा रिक्त होणार आहे. त्यामुळे या ६ जागांवर कोणाची वर्णी लागणार, यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. सध्या या ६ जागांपैकी ३ जागा सत्ताधारी पक्षाच्या आहेत तर मविआतील घटकपक्षाकडे ३ जागा आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत विरोधी पक्षाला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शेतकरी कंपनीचा शेतमाल आता अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या प्लॅटफॉर्मवरून मोठ्या बाजारपेठेत जाणार – धनंजय मुंडे

मुंबई शेतकऱ्यांनी शेती विषयक विचार बदलले पाहिजेत, शेतीला उद्योग म्हणून पाहिले पाहिजे त्यादृष्टीने शेती केली पाहिजे तरच शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतील असे प्रतिपादन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. शेतकरी कंपनीचा शेतमाल आता अमेझॉन, फ्लिपकार्ट, हिंदुस्तान युनीलिव्हर, टाटा यांसारख्या मोठ्या बाजारपेठेत थेट जाणार आहे. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफाॅर्मेशन (MITRA ), कृषी विभाग,मा.बाळासाहेब ठाकरे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रता प्रकरणात निर्णय घेण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना दोन आठवड्यांची मुदत वाढवून दिली असून त्यामुळे १५ फेब्रुवारीपर्यंत सुनावणी पूर्ण होईल असंही सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्यावर्षी २०२३ मध्ये शरद पवार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Video : अजितदादा अॅक्शन मोडवर, सकाळीच कोल्हापूरच्या तालमी क्रीडा अधिकाऱ्यांचा घेतली शाळा!

कोल्हापूर आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. अजित दादांनी सकाळी तालमीची पाहणी केली. क्रीडा अधिकाऱ्यांना तालमीत नसल्याचं पाहून दादांनी त्यांना फोन करून चांगलाच समाचार घेतला. वेळेवर उपस्थित न राहिल्याने दादांनी त्यांना वेळेची आठवण करून दिली. अजित पवारांनी गंगावेश तालमीला भेट दिली आणि येथील कुस्तीपट्टूंशी चर्चा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तालमींना मदत करण्याचं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मराठा आरक्षणाच्या विजयी सभेत दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर का?

धुळे मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळे ओबीसींवर अन्याय होत असल्याची टीका ओबीसी नेत्यांकडून केली जात आहे. अद्याप सरकारने अध्यादेश काढला नसून हा केवळ मसूदा आहे, याविरोधात मोठ्या संख्येने हरकती पाठवल्या जातील असं ओबीसी नेत्यांकडून सांगितलं जात आहे. आता याविरोधात काँग्रेसकडूनही टीका केली जात आहे. संभ्रम निर्माण करून मराठा समाजाची फसवणूक करणे योग्य नाही, सरकारने खुलासा करावा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘ती अतिशय चुकीची…..’; कुख्यात गुंड गजा मारणे आणि पार्थ पवार यांच्या भेटीवर काय म्हणाले अजित पवार?

पुणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार आणि कुख्यात गुंड गजा मारणे यांच्या भेटीचा व्हिडीओ आणि फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यावर विरोधकांनी टीका केली. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, ती अतिशय चुकीची गोष्ट घडलेली असून मी त्याबद्दल माहिती घेत आहे. अजित पवार पुढे म्हणाले की, काही […]