मुंबई
‘द राजकारण’ ने काल १ फेब्रुवारी रोजी छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याला दुजोरा देणारं ट्विट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं आहे. त्यामुळे छगन भुजबळ पुढील लोकसभा निवडणूक भाजपमधून लढवणार असल्याच्या राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
मंत्री छगन भुजबळ हे अजित पवार गटात अस्वस्थ असल्याचं सांगितलं जात आहे. मराठा आरक्षणावर घेतलेल्या भूमिकेनंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशीही मागणी जोर धरत आहे. दुसरीकडे भाजपमध्ये राज्य पातळीवर पॉवरफूल ओबीसी नेतृत्व दिसून येत नाही.

चंद्रशेखर बावनकुळे आणि पंकजा मुंडेंना मर्यादा आहे. अशावेळी छगन भुजबळांची एन्ट्री भाजपमधील ओबीसी नेतृत्व म्हणून पुढे येऊ शकते. भुजबळ कुटुंबातून स्वत: छगन भुजबळ किंवा समीर भुजबळ भाजपचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार असतील अशी माहिती समोर आली आहे.
यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. ‘भुजबळ भाजपच्या वाटेवर? एके काळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप; अशा शब्दात त्यांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. ‘द राजकारण’ने १ फेब्रुवारी रोजी केलेल्या बातमीला दुजोरा अंजली दमानिया यांच्या ट्विटमुळे झाला आहे. ही घडामोड प्रत्यक्षात कधी घडणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.
सविस्तर बातमी – महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप? चर्चेत असलेले भुजबळ नवा राजकीय बॉम्ब टाकणार!
https://therajkaran.com/big-breaking-chhagan-bhujbal-will-contest-lok-sabha-elections-from-bjp/