मुंबई
राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून २७ फेब्रुवारी रोजी १५ राज्यात निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातून सहा जागा रिक्त होणार आहे. त्यामुळे या ६ जागांवर कोणाची वर्णी लागणार, यासाठी चढाओढ सुरू झाली आहे.
सध्या या ६ जागांपैकी ३ जागा सत्ताधारी पक्षाच्या आहेत तर मविआतील घटकपक्षाकडे ३ जागा आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत विरोधी पक्षाला आपला गड राखता येईल का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाराष्ट्रातील या ६ खासदारांचे सदस्यत्व संपणार
१ परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन
२ केंद्रीय मंत्री नारायण राणे
३ माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
४ काँग्रेसचे नेते कुमार केतकर
५ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या वंदना चव्हाण
६ शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई
आता या सहा जागांवरील उमेदवार पुन्हा निवडणूक जाणार की याच्या जागेवर दुसऱ्याची वर्णी लागणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कोणकोणत्या राज्यांमध्ये निवडणूक होणार
महाराष्ट्र – ६
उत्तर प्रदेश -१०
बिहार – ६
पश्चिम बंगाल – ५
मध्य प्रदेश – ५
गुजरात – ४
आंध्र प्रदेश – ३
तेलंगणा – ३
राजस्थान – ३
कर्नाटक – ४
उत्तराखंड – १
छत्तीसगड – १
ओडिशा – ३
हरियाणा -१
हिमाचल प्रदेश – १
केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ राज्यांच्या ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
कसा असेल राज्यसभा निवडणूक कार्यक्रम…
- अधिसूचना जाहीर होण्याची तारीख – ८ फेब्रुवारी.
- अर्ज करण्याची मुदत – १५ फेब्रुवारी
- उमेदवारांच्या अर्जांची छाननी – १६ फेब्रुवारी
- अर्ज मागे घेण्याची तारीख – २० फेब्रुवारी
- मतदान – २७ फेब्रुवारीला सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत.
- मतमोजणी – २७ तारखेला सायंकाळी मतमोजणी व निकाल जाहीर.