राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran

मुंबई

राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे का ? केवळ लाल किल्लाच नाही तर देशातील महाराष्ट्रासह अनेक राज्यात फडकणारा तिरंगा मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर या शहरात तयार केला जातो.

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर हे एक ऐतिहासिक (National Tricolour prepares in Gwalior city of Madhya Pradesh) शहर आहे. वीरांगणा राणी लक्ष्मीबाई हिच्या शौर्याचे साक्षीदार असलेले हे शहर आहे. राणी लक्ष्मीबाई यांच्या व्यतिरिक्त सरदार भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांच्यासह शेकडो क्रांतिकारकांनी अज्ञातवासात राहण्यासाठी याच ग्वाल्हेर शहराचा आसरा घेतला होता.

देशात केवळ तीन ठिकाणी तिरंग्याची निर्मिती होते

ग्वाल्हेर शहरात राष्ट्रध्वज अर्थात तिरंगाचे निर्माण केले जाते. उत्तर भारतातील हे एकमेव आणि देशातील तिसरे शहर आहे ज्या ठिकाणी तिरंगा तयार केला जातो. भारताची आन -बान आणि शान असलेला हा तिरंगा स्वातंत्र्य दिनी लाल किल्लासहित सर्वच सरकारी कार्यालय, मंत्रालय, सचिवालय, न्यायालय या इमारतींवर मोठ्या डौलाने फडकत असतो.

महात्मा गांधी यांच्या 1924 मधील चरखा आंदोलनातून प्रेरणा घेऊन मध्य प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री तखतमल जैन यांनी 1930 मध्ये स्थापित केलेल्या मध्यभारत खादी संघ संस्थेतून गेले अनेक वर्ष राष्ट्रध्वजाची निर्मिती केली जात आहे. या संदर्भात बोलताना खादी संघाचे अध्यक्ष आणि वरिष्ठ काँग्रेस नेता वासुदेव शर्मा यांनी सांगितले की, पूर्वी आम्ही राष्ट्रध्वजासाठी वस्त्र/कपडा तयार करत असू आणि हा कपडा मुंबई आणि कर्नाटकातील हुबळी येथे पाठवत असू.

ग्वाल्हेर खादी संघात तयार होतो निरनिराळ्या आकारातील तिरंगा

शर्मा यांनी दावा केला की राष्ट्रध्वजासाठी ज्या प्रकारचे वस्त्र लागते, ते फक्त त्यांच्या खादी संघात तयार होते, तसे वस्त्र देशात अन्यत्र कुठेही तयार होत नाही. ते पुढे म्हणाले ज्यावेळी आम्ही मुंबई आणि हुबळी या केंद्रांकडून राष्ट्रध्वजासाठी वस्त्राची मागणी करत असू, त्यावेळी आम्हाला ते जास्त किमतीमध्ये खरेदी करावे लागत होते. म्हणून मग आम्ही निश्चय केला की आपण स्वतःच राष्ट्रध्वजाची निर्मिती करावी. त्यासाठी 16 वेगवेगळ्या विभागांची परवानगी घ्यावी लागते. आमच्या खादी संघाला आयएसआय मार्क (Madhya Bharat Khadi Sangh received ISI mark to prepare National Flag) मिळाला आहे आणि आता ग्वाल्हेर संघ हे देशातील तिसरे आणि मध्य प्रदेशातील एकमेव असे केंद्र आहे ज्या ठिकाणी राष्ट्रध्वजासाठी लागणाऱ्या सूतकताईपासून तर त्याच्या निर्माणपर्यंतची पूर्ण प्रक्रिया राबवली जाते.

मध्यभारत खादी संघाकडून आयएसआय मानकाप्रमाणे तीन आकारात तिरंगा झेंडा तयार केला जातो. यात दोन बाय तीन फूट, चार बाय सहा फूट आणि तीन बाय साडेचार फुटाच्या झेंड्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त अन्य काही आकारांच्या झेंड्यांची देखील मागणी असते आणि ती देखील या संघाद्वारे पूर्ण केली जाते अशी माहिती वासुदेव शर्मा यांनी दिली.

शर्मा यांनी सांगितले की राष्ट्रध्वज तयार करण्याची एक संहिता आहे आणि त्या संहितेचे पूर्णपणे पालन करावे लागते. यात कापडाचा दर्जा, त्याचा रंग, चक्राचा आकार यावर विशेष लक्ष द्यावे लागते. एकूण नऊ मानकांचा विचार करूनच राष्ट्रीय तिरंगा तयार केला जातो.

या राज्यांना पुरवला जातो ग्वाल्हेरचा तिरंगा

आतापर्यंत ग्वाल्हेर खादी संघातून 14 राज्यांना तिरंगी झेंडे पुरवले जात असे. त्यामध्ये मध्य प्रदेशासह उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दिल्ली, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब आणि छत्तीसगड यांचा समावेश होता. या वर्षापासून जम्मू काश्मीर आणि गोवा हे राज्य आणि अंदमान निकोबार या केंद्र शासित प्रदेशाचा समावेश झाला आहे.

ग्वाल्हेरच्या या खादी संघातील कारागिरांनी यावर्षी जवळपास 16 हजार तिरंगी झेंडे तयार केले असून त्याची किंमत जवळपास एक कोटीहून जास्त आहे.

कोरोनाचा झाला होता खादी संघावर परिणाम

कोरोना महामारीच्या (Khadi Sangh affected during corona pandemic) काळात मध्यभारत खादी संघावर देखील परिणाम झाला. त्या काळात तिरंग्यांची विक्री कमी झाली. परंतु या संघाने त्यांच्या कारागिरांना कामावरून कमी न करता त्यांना घरी बसून वेतन दिले, अशी माहिती वासुदेव शर्मा देतात. या संघाच्या माध्यमातून जवळपास 300 परिवारांना रोजगार मिळाला आहे. शर्मा म्हणतात की कोरोना महामारीमुळे देशाचा व्यापार, रोजगार, अर्थव्यवस्था यावर प्रतिकूल परिणाम झाला हे खरं असलं, तरी भारत हा असा देश आहे जिथे लोकांमध्ये देशप्रेम ठासून भरले आहे आणि म्हणूनच ग्वाल्हेरचे खादी संघ कार्यरत होते आणि सदैव कार्यरत राहील.

(New and photo courtesy – MP Breaking News)

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

संविधान बदलासंदर्भात पंतप्रधानांनी खुलासा करावा – प्रदेश काँग्रेसची मागणी

Twitter : @NalavadeAnant मुंबई डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याची भाषा आरएसएस (RSS) व भाजपामधून (BJP) सातत्याने केली