राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran

नवी दिल्ली

76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये निवासी आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांच्या हस्ते कस्तुरबा गांधी मार्ग आणि कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी समूह राष्ट्रगीत व राज्यगीताचे सादरीकरण झाले. यावेळी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे पथसंचलनही झाले.

या कार्यक्रमास महाराष्ट्र सदनाचे सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावार, श्रीमती स्मिता शेलार, निवासी अभियंता जे.डी. गंगावार, उपअभियंता (विद्युत) आशुतोष दिवेदी, महाराष्ट्र सदनाच्या व्यवस्थापक भागवंती मेश्राम, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दोन्ही सदनात निवासास असणारे अतिथी तसेच दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांचे अधिकारी- कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

दरम्यान, राजधानीतील लाल किल्ल्यावर आयोजित मुख्य कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी त्यांनी देशाला संबोधित केले. देशभरातून विविध क्षेत्रातील 1800 लोक या मुख्य कार्यक्रमात सहभागी झाले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

Rajkaran Bureau

About Author

2 Comments

  1. Landon Zuk

    August 15, 2023

    Hmm is anyone else having problems with the pictures on this blog loading? I’m trying to figure out if its a problem on my end or if it’s the blog. Any suggestions would be greatly appreciated.

  2. sfokcertopsde

    August 15, 2023

    I am no longer positive where you’re getting your info, however great topic. I needs to spend some time finding out much more or figuring out more. Thank you for magnificent information I used to be on the lookout for this info for my mission.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे
राष्ट्रीय

संविधान बदलासंदर्भात पंतप्रधानांनी खुलासा करावा – प्रदेश काँग्रेसची मागणी

Twitter : @NalavadeAnant मुंबई डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याची भाषा आरएसएस (RSS) व भाजपामधून (BJP) सातत्याने केली