ताज्या बातम्या महाराष्ट्र

अखेर ठरलं! लोकसभेत सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार लढत

बारामती शरद गटाला अस्वस्थ करणाऱ्या महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांनी आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. अजित पवार शरद पवारांना घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड अजितांना घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकमेकांना उत्तर देण्यासाठी दोघांमध्ये स्पर्धाच सुरू आहे. त्यामुळे यावेळी बारामती लोकसभा निवडणूक रंजक ठरणार आहे. बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना खणखणीत उत्तर; सेल्फीवरुन मोदींच्या इतिहासाचा पाढाच वाचला!

मुंबई ‘आपल्याला बारामतीचा, महाराष्ट्राचा विकास करून घ्यायचा आहे. यासाठी नुसता खासदार निवडून द्यायचा आणि त्याने संसदेत फक्त भाषणं करायची, यातून प्रश्न सुटत नाहीत. मी मतदारसंघात न येता, मुंबईत बसून उत्तम संसदपटू म्हणून खिताब मिळविला असता तर मतदारसंघातील कामं झाली असती का? नुसतं सेल्फी घेऊन कामं होत नसतात, अशा शब्दात अजित पवार यांनी बारामतीच्या विद्यमान खासदार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यसभा निवडणूक बिनविरोध; अधिकृत घोषणा अर्ज माघारीनंतरच

X : @milindmane70 मुंबई राज्यसभा निवडणुकीसाठी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विश्वास जगताप यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरल्यानंतर मोठा ट्विस्ट निर्माण झाला होता. मात्र आज पडताळणीअंती त्यांचा अर्ज बाद ठरल्याने आता निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर पाठवायच्या सहा सदस्यांसाठीची निवडणूक अखेर बिनविरोध झाली आहे. यामध्ये भाजपाचे तीन व मित्र पक्षांचे दोन याप्रमाणे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्यावतीने 18 फेब्रुवारीला नवी मुंबईमध्ये अल्पसंख्याक विश्वास मेळावा

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलच्यावतीने शिक्षण, आरक्षण व संरक्षणाच्या प्रश्नावर राज्यस्तरीय ‘अल्पसंख्याक विश्वास मेळावा’ १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सिडको कन्वेक्शन सेंटर वाशी (नवी मुंबई) इथे आयोजित करण्यात आल्याची माहिती अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिली. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्यावतीने षण्मुखानंद सभागृहात भव्य महिला मेळावा झाला आणि त्यानंतर युवा मिशन मेळावा पुणे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठवाड्यात महाविद्यालय वाटपात मंत्री चंद्रकांत दादांकडून राष्ट्रवादीच्या आमदारांना झुकते माप

@therajkaran छत्रपती संभाजीनगर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाविद्यालय वाटप करत असताना मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या संस्थांना झुकते माप दिले आहे. यामुळे भाजप समर्थक तसेच इमाने इतबारे शिक्षण देऊ पाहणाऱ्या अनेक संस्थांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.  विशेष म्हणजे विधी महाविद्यालय वाटप करत असताना न्याय देऊ पाहणाऱ्या संस्थांवरच अन्याय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचे दोन्ही गटाचे आमदार पात्र, विधानसभा अध्यक्षांचा महत्त्वाचा निकाल

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल काल गुरुवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला. शिवसेनेचा निर्णय देताना ज्या मुद्द्यांचा आधार घेण्यात आला होता, त्याच आधारावर नार्वेकरांनी राष्ट्रवादीचाही निकाल दिला. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील एकही आमदार अपात्र नसल्याचा निर्वाळा देण्यात आला. मात्र राष्ट्रवादी शरद पवार गट या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावणार आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वरुड-मोर्शीचा संत्रा प्रक्रिया प्रकल्प उत्पादकांसाठी ठरेल गेम चेंजर; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विश्वास

मुंबई संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव देण्यासाठी वरुड-मोर्शी येथील अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. हा प्रकल्प संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गेम चेंजर ठरेल, असा विश्वास व्यक्त करुन वरुड-मोर्शी येथे अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्त […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर आज निकाल

मुंबई आज राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता प्रकरणावर निकाल असल्याने शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. विधानसभा अध्यक्ष आज सायंकाळी हा निकाल जाहीर करणार असल्याची माहिती आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालात कोणत्याही आमदाराला अपात्र ठरवलं नव्हतं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत वेगळा निकाल लागू शकण्याची शक्यता […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

ना पार्थ पवार, ना बाबा सिद्दीकी, ना सुनील तटकरे; राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी अनपेक्षित नावाची घोषणा!

मुंबई आज भाजप, शिवसेना शिंदे आणि काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कोणाचं नाव जाहीर करणार, याबाबत मोठी चर्चा सुरू होती. अखेर सस्पेंस संपला असून अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आताच राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

निमगाव येथील खंडोबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी लिफ्टची सोय करा; अजित पवारांचे निर्देश

मुंबई पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील निमगाव येथील खंडोबा मंदिर हे पौराणिक धार्मिक स्थळ आहे. याठिकाणी भरणाऱ्या यात्रेला दरवर्षी तीन ते चार लाख भाविक येत असतात. त्याचप्रमाणे वर्षभर येणाऱ्या भाविकांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, मुले, महिला आदी भाविकांना मंदिरापर्यंत जाण्याची योग्य सोय होण्यासाठी अत्याधुनिक लिफ्टची सोय करावी. त्यासाठी लागणारी शासकीय जमीन […]