मुंबई
आज भाजप, शिवसेना शिंदे आणि काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कोणाचं नाव जाहीर करणार, याबाबत मोठी चर्चा सुरू होती. अखेर सस्पेंस संपला असून अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आताच राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटात आलेले बाबा सिद्दीकी, सुनील तटकरे, पार्थ पवार, समीर भुजबळ यांच्या नावाची चर्चा होती. मात्र अजित पवार गटाने सरप्राईज देत राज्यसभेसाठी प्रफुल्ल पटेल यांचं नाव जाहीर केलं आहे. पटेल खासदारकीचा राजीनामा देऊन राज्यसभेसाठी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पटेलांची राज्यसभेची टर्म संपायला अद्याप ३ वर्षे
प्रफुल्ल पटेल राज्यसभेत असून त्यांचा कार्यकाळ संपायला अद्याप तीन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे पटेलांना खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा राज्यसभेसाठी अर्ज दाखल करावा लागणार आहे. मात्र पक्षात इतर चेहरे असतानाही पक्षाने पटेलांचा कार्यकाळ शिल्लक असतानाही पुन्हा त्यांचचं नाव का जाहीर केलं, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे हा निर्णय मोठा धक्कादायक असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
महायुतीकडून राज्यसभेच्या उमेदवारांची नावं आज जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. तर मुंबईतील काँग्रेसचे निष्ठावंत आणि दलित नेते चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसकडून राज्यसभेसाठी तिकिट देण्यात आलेलं आहे.
महाराष्ट्रातून राज्यसभेत जाणाऱ्या सहा उमेदवारांची नावं आली समोर
२ मेधा कुलकर्णी
३ डॉ. अजित गोपछडे
४ मिलिंद देवरा
५ चंद्रकांत हंडोरे
६ प्रफुल्ल पटेल