“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ, पुस्तके डिजिटल करणे काळाची गरज” — विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे
मुंबई: मुंबईतील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ कॉलेज, बुद्ध भवन येथील ग्रंथालयाला आज विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी ग्रंथालयातील मौल्यवान साहित्याचा आढावा घेतला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथसंपदेचे डिजिटलायझेशन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. या ग्रंथालयात एक लाखांहून अधिक ग्रंथ आणि दुर्मिळ पुस्तके जतन केलेली आहेत. उपाध्यक्ष बनसोडे म्हणाले, […]