Assembly Session : “लाडक्या बहिणींना अडवले ते तुम्ही; योजना बंद करण्यासाठी कोर्टातही तुम्ही गेलात”— उपमुख्यमंत्री शिंदे
नागपूर : हिवाळी अधिवेशनात ‘माझी लाडकी बहीण’ योजनेवरून बुधवारी प्रचंड गदारोळ झाला. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी मुद्देसूद उत्तरे दिल्यानंतरही विरोधकांचा गोंधळ कायम राहिला. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट विरोधकांवर हल्लाबोल करत करारी प्रतिक्रिया दिली. शिंदे म्हणाले, “योजना सुरू होताच तिला ‘फसवी घोषणा’ म्हणणारे तुम्हीच. इतकेच नाही, योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात गेले तेही तुमचेच नेते. वडपल्लीवार कोर्टात गेले नव्हते […]









