ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राऊतांनी शिंदेंचा नवा फोटो केला ट्विट, असे असल्यावर दोन पायांची कुत्र्याची पिल्ले नाहक मरणारच म्हणत पुन्हा जोरदार टीका

मुंबई संजय राऊत गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुंडांसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत आहेत. महाराष्ट्रात होणाऱ्या गोळीबारामागे राज्यातील गुंडाराज कारणीभूत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. संजय राऊतांनी आज चौथा फोटो शेअर केला आहे, ज्यात मुख्यमंत्री एका गुंडासोबत असल्याचा दावा राऊतांनी केला आहे. राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, गृहमंत्री देवेंद्रजी, यालाच म्हणतात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

सूड…प्लान…मैत्री अन् शेवटी The End; बायकोला सांगितल्याप्रमाणे मॉरिसने असा काढला घोसाळकरांचा काटा

मुंबई ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाइव्हदरम्यान गोळ्या झाडण्यात आल्या, यात त्यांचा मृत्यू झाला आहे. मोरिश नोरान्हो याने त्यांना बोलावून हत्या केली. यानंतर मोरिशने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र त्याने इतकं टोकाचं पाऊल का उचललं, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात अनेक दावे केले जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘गृहमंत्री फडणवीस अकार्यक्षम, हतबल निष्क्रीय व लाचार, त्यांना माणूस व कुत्र्यामधील फरकही समजेना’; विरोधकांचं टीकास्त्र

मुंबई ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाइव्हदरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर विरोधकांकडून राज्य सरकारला घेरण्यात आलं आहे. यापूर्वी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केला होता. त्यांच्याविरोधात अद्यापही पक्षाकडून शिस्तभंगाची किंवा इतर कोणतीही कारवाई करण्यात आलेली आहे. यावर विरोधतांनी संताप व्यक्त केला आहे. ‘महाराष्ट्रात […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय विश्लेषण

काँग्रेसच्या बड्या नेत्यासह तिघांना भारतरत्न, पंतप्रधानांनी ट्विट करत केलं जाहीर

नवी दिल्ली केंद्र सरकारने माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग आणि पीव्ही नरसिंह राव यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा केली आहे. शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांनाही भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर याची घोषणा केली. यापूर्वी हा सन्मान बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

ठाकरे गटाचे नेते घोसाळकरांवरील गोळीबारानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची बैठक, घेतला महत्त्वाचा निर्णय

मुंबई ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाइव्हदरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा या व्यक्तीने घोसाळकरांवर गोळ्या घातल्या. त्याने आपल्या सुरक्षा रक्षकाची पिस्तूल घेऊन गोळ्या झाडल्याचं सांगितलं जात आहे. या पिस्तुलाच्या परवान्याविषयीही शंका उपस्थित केली जात आहे. काही दिवसांपूर्वी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. याशिवाय गेल्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘गाडीखाली श्वानाचा मृत्यू झाला तरी विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतात’, घोसाळकर गोळीबार प्रकरणात फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाइव्हदरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली. काही दिवसांपूर्वी भाजप आमदाराने पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केला होता. या घटनांवरुन विरोधी पक्षाकडून गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून महाराष्ट्राचा बिहार झाल्याच घणाघात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

घोसाळकरांवर गोळीबार झाला तेव्हा हजर असलेल्या मेहुल पारेखला अटक, घटनेपूर्वी केली होती रेकी

मुंबई दहिसरमध्ये फेसबुक लाइव्हदरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पूत्र आणि दहिसरचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नोरोन्हा याने गोळ्या झाडून अत्यंत निघृणपणे हत्या केली. या प्रकरणात मेहुल पारेख नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मेहुलला या घटनेविषयी माहिती होती आणि त्याने ऑफिस बाहेर रेकीही केली होती. रात्री उशिरा मेहुल […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

संजय राऊतांचा धडाका सुरूच, सलग तिसऱ्या दिवशी शिंदेंचा गुंडांसोबतचा फोटो शेअर

मुंबई संजय राऊतांचा धुमधडाका सुरूच असून आज तिसऱ्या दिवशी सलग त्यांनी फोटोबॉम्ब शेअर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गुंडासोबतचा फोटो ट्विट करीत पुन्हा एकनाथ शिंदेंना घेरण्यात आलं आहे. शिंदे गँगच्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा. ठाणे पुणे परिसरात हत्या, अपहरण, सोन्याचांदीच्या दुकानांवर दरोडे, अशा दाखलेबाज गुन्ह्यात सहभागी असलेल्या या महाशयांचे स्वागत मुख्यमंत्री उत्साहाने करीत आहेत, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंकजा मुंडेंची राज्यसभेत वर्णी लागणार का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं…

मुंबई पंकजा मुंडेंची राज्यसभेत वर्णी लागणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आज स्पष्टच सांगितलं. येत्या २७ फेब्रुवारी रोजी राज्यसभेच्या निवडणूक पार पडणार आहेत. यंदा महाराष्ट्रातील ६ खासदारांचा कार्यकाळ २ एप्रिलला संपणार आहे. यामध्ये प्रकाश जावडेकर, नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई, व्ही मुरलीधरन आणि वंदना चव्हाण यांचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कृषी विभागाच्या पुरस्काराच्या रकमेत चौपट वाढ, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

मुंबई राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित उल्लेखनीय कार्याकरिता देण्यात येणाऱ्या विविध पुरस्करांच्या रकमेत चौपट वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. ते म्हणाले, शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये अतिउल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेस कृषी विभागामार्फत दरवर्षी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी वेळोवेळी कृषी […]