ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

घोसाळकरांवर गोळीबार झाला तेव्हा हजर असलेल्या मेहुल पारेखला अटक, घटनेपूर्वी केली होती रेकी

मुंबई

दहिसरमध्ये फेसबुक लाइव्हदरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पूत्र आणि दहिसरचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नोरोन्हा याने गोळ्या झाडून अत्यंत निघृणपणे हत्या केली. या प्रकरणात मेहुल पारेख नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मेहुलला या घटनेविषयी माहिती होती आणि त्याने ऑफिस बाहेर रेकीही केली होती.

रात्री उशिरा मेहुल पारेखला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मेहुल हा मॉरिसचा कट्टर समर्थक आणि त्याची पीए असल्याचं सांगितलं जात आहे. या गोळीबारापूर्वी जे फेसबूक लाइव्ह करण्यात आले होते, त्यावेळी मॉरिस यांनी स्वत:च मेहुल इज हिअर, असे जाहीर केले होते. त्यावेळी मोबाईलच्या मागे मेहुल नावाची व्यक्ती होती, हे स्पष्ट झाले होते. गोळीबाराच्या या घटननंतर मेहुल पारेख घटनास्थळावरून फरार झाला होता. आता अखेर रात्री उशीरा त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.

पोलिसांनी आरोपी मॉरिस याच्या कार्यालयात गुरुवारी रात्री ९ वाजेपासून शुक्रवारी पहाटे ४.३० पर्यंत पंचनामा केला. जवळपास ७.३० तास सुरू असलेल्या पंचनाम्यात एक पिस्तूल, जिवंत काडतुसं आणि सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले.

अभिषेक घोसाळकर यांचा गुरुवारी फेसबुक लाइव्ह सुरू असताना गोळ्या घालून खून करण्यात आला. त्यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर गुंड मॉरिसने स्वत:वरही गोळीबार करून घेतला. गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. राजकीय वैमनस्य, पैशांचा वाद यातून हा खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Rajkaran Bureau

About Author

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात