ताज्या बातम्या महाराष्ट्र

संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना पाठवलेल्या पत्रातील माहिती खोटी; गृहविभागाकडून स्पष्टीकरण

मुंबई राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले होते. त्यात न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाकडे एप्रिल 2023 पासून डीएनए किट्स उपलब्ध नसल्याचे म्हटले होते. ही माहिती संपूर्णपणे खोटी असून, याबाबत गृहविभागाकडून खालीलप्रमाणे वस्तुस्थिती दिली जात आहे. 1) न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा ही गृह विभागांतर्गत काम करते आणि मुंबईसह एकूण 8 ठिकाणी डीएनए […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Big Breaking : विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयापूर्वीच मराठा आरक्षणाचा निर्णय? उद्या अध्यादेश निघणार?

मुंबई मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या पवित्र्यात आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोरील शिवसेनेच्या 54 आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर १० जानेवारी रोजी निर्णय घेतला जाणार आहे. त्यापूर्वीच महाराष्ट्रात मोठी घडामोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्या मराठा आरक्षणावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून उद्याच्या कॅबिनेट बैठकीनंतर मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला जाऊ शकतो. कॅबिनेटनंतर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

काळे कायदे पारित करून जनतेस वेठीस धरण्याचं काम, नव्या मोटार वाहन कायद्याचा वडेट्टीवारांकडून निषेध

नवी दिल्ली केंद्र सरकारने आणलेला प्रस्तावित नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रक आणि टँकर चालक आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुकारलेल्या संपामुळे राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाहन चालकांसाठीचा हा कायदा अत्यंत कठोर व जुलमी असल्याची भूमिका विरोधी पक्षाकडून व्यक्त केली जात आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वाहन चालकांवर अन्याय करणारा जुलमी नवीन मोटार वाहन कायदा रद्द करा – नाना पटोले

जुलमी काळा कायदा मंजूर करण्यासाठीच विरोधी पक्षांच्या १४६ खासदारांचे निलंबन. मुंबई केंद्रातील मोदी सरकारने आणलेला नवीन मोटार वाहन कायदा हा वाहन चालकांसाठी अत्यंत कठोर व जुलमी आहे. या काळ्या कायद्यानुसार अपघात झाल्यास ट्रक चालकास दहा वर्षांची शिक्षा तसेच सात लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. या काळ्या कायद्विरोधात वाहन चालकांमध्ये तीव्र संताप असून टँकरचालकांनी संप […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मध्यरात्रीच्या रक्तदान शिबिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही केले रक्तदान

ठाणे स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे यांच्या काळापासून नववर्ष स्वागतार्थ सुरू केलेल्या मध्यरात्रीच्या रक्तदान शिबिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:ही रक्तदान करून एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला. दिघे साहेबानी घालून दिलेली शिकवण पुढे नेण्यासाठी 31 डिसेंबरच्या मध्यरात्री मद्यधुंद होऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याऐवजी रक्तदान करून नवीन वर्षाचे स्वागत करावे असा संदेश त्यांनी आजच्या तरुणाईला दिला. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नववर्षात वाचाळवीरांना सुबुद्धी द्यावी, फडणवीसांच्या निशाण्यावर कोण?

मुंबई नागपूर विमानतळावर आज सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी माध्यमांनी फडणवीसांना नव्या वर्षाच्या टार्गेटसंदर्भात विचारलं. आधी फडणवीसांनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले, नवं वर्ष सर्वांना सुख-समाधानाचे जावो, हीच अपेक्षा. खरं म्हणजे जनतेच्या ज्या अपेक्षा असतात त्याच आमच्याही असतात. त्यामुळे नव्या वर्षात जनतेला त्यांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करता याव्यात, ही ईश्वरचरणी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंना निमंत्रण का नाही? आता राम मंदिराच्या पुजाऱ्यांनीच दिलं उत्तर

अयोध्या अयोध्येत रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेची तयारी मोठी जोमात सुरू आहे. २२ जानेवारी रोजी राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. उद्घाटन सोहळ्यात सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, अधीर रंजन चौधरींसह अनेक विरोधी पक्ष नेत्यांना आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. तर दुसरीकडे शिवसेना आणि सीपीएमच्या नेत्यांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलं नाही. यावरुन संजय राऊतांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘सोम्या-गोम्या’वरुन अजित दादा आणि संजय राऊतांमध्ये जुंपली!

मुंबई संजय राऊत यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात आयोजित केलेल्या महाविकास आघाडीच्या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या सांगता सभेत, आमच्या पाडापाडीच्या खेळात तुम्ही पडाल असं म्हणत अजित पवारांवर निशाणा साधला होता. यावर अजित पवारांनीही दिलेल्या उत्तरानंतर दोघांमध्ये जुंपली आहे. अजित पवारांना याबाबत विचारल्यावर, सोम्या-गोम्याच्या प्रश्नावर बोलत नाही, अशा शब्दात प्रतिक्रिया दिली होती. यानंतर संजय राऊतांनीही यावर जहरी टीका […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

PM Modi Ayodhya : ’22 जानेवारीला घराघरात दिवे लावा, दिवाळी साजरी करा’ – नरेंद्र मोदी

अयोध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातील अयोध्येत महर्षी वाल्मीकी आंतरराष्ट्रीय हवाई तळ अयोध्या धामचं उद्घाटन केलं. यासोबतच १५,७०० कोटींच्या योजनांचं लोकर्पण आणि पायाभरणीदेखील केली. ते म्हणाले की, आज संपूर्ण जग मोठ्या उत्सुकतेने २२ जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची प्रतीक्षा करीत आहेत. आज अयोध्या धाम रेल्वे स्थानक आणि अयोध्या विमानतळाचं उद्घाटन करण्यात आलं. अयोध्येतील राम मंदिराचं २२ जानेवारीला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘आता श्रीरामाला लोकसभेचं तिकीत देणं बाकी राहिलंय’, संजय राऊतांचा घणाघात

मुंबई देशभरात अयोध्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेची जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान आज अयोध्या रेल्वे स्थापनाकाचं आणि विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गाजतवाजत करण्यात आलं. अयोध्येच मोदींच्या रोड शोचं भव्य आयोजनही करण्यात आलं आहे. एखाद्या सण-उत्सवाप्रमाणे देशभरात राम मंदिरांची तयारी सुरू आहे. विरोधकांकडून मात्र भाजप श्रीरामाचं राजकारण करीत असल्याचा आरोप केला जात आहे. संजय […]