ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात, आमच्यात मतभेद नाहीत’; राऊतांनी स्पष्ट केलं

मुंबई मुख्यमंत्री घटनाबाह्य पद्धतीने बसले आहेत, निवडणूक आयोग घटनाबाह्य सरकारला पाठबळ देत आहे. जो न्याय अदानींना मिळतो, देशातील जनतेला का मिळत नाही, हा प्रश्न आहे. अदानी श्रीमंत म्हणजे भाजप श्रीमंत, असा टोला शिवसेनेच्या उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला. महाविकास आघाडी आणि वंचित बहुजनसोबत चर्चा सुरू असून ती सकारात्मक पातळीवर असल्याचं राऊतांनी यावेळी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

मणिपूर ते मुंबई :15 राज्यं, 6700 किमी प्रवास; कसा असेल भारत जोडो न्याय यात्राचा रूट मॅप?

नवी दिल्ली १४ जानेवारीपासून काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्राला सुरुवात होणार आहे. ही यात्रा १४ जानेवारी ते २० मार्चपर्यंत असणार असून राहुल गांधी या न्याय यात्रेचं नेतृत्व करतील. या यात्रेत ६७०० किलोमीटरहून अधिक प्रवास केला जाणार आहे. ६७ दिवस, ११० जिल्हे, १०० लोकसभा, ३३७ विधानसभेचा दौरा या भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने केला जाणार आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

आयकर विभागातील 1200 पैकी केवळ 3 पदे मराठी तरुणांना, नोकऱ्या महाराष्ट्रात भरती परप्रांतीयांची; शिवसेनेचा केंद्राला जाब

मुंबई आयकर विभागातील १२०० पैकी केवळ ३ पदे मराठी तरुणांना मिळाली आहेत. केंद्राला महाराष्ट्रात उत्तर भारतीयांची कार्यालयं थाटायची आहेत का, असा सवाल शिवसेनेने केंद्राला केला आहे. शासकीय नोकरी महाराष्ट्रात पण त्यात एक टक्काही मराठी तरुणांना संधी नसल्याचं उघड झाल्याचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. या प्रकरणात रेल्वे महामंडळाला पत्र लिहून सावंत यांनी जाब विचारला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पुण्यात राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक सुरू

पुणे मराठा समाज मागास आहे का, याची चाचपणी करण्याची जबाबदारी सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाकडे दिली असून आज पुण्यात राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक सुरू आहे. सर्किट हाऊस येथे बैठकीला सुरूवात झाली असून या बैठकीत सर्वेक्षण चाचणी बाबत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या बैठकीत निकषांवर चर्चा झाली होती. त्यामुळे आजच्या बैठकीत या निकषांवर निर्णय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘राम मांसाहारी होते…’, आव्हाडांनी दिला ऐतिहासिक संदर्भ; भावना दुखावल्या तर खेद!

शिर्डी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल आपल्या भाषणात राम शिकार करून खात होते, असं वक्तव्य केलं होतं. यानंतर राज्यभरात भाजपकडून त्यांच्याविरोधात तीव्र विरोध व्यक्त करण्यात आला. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना माफी मागण्याची विनंती केली तर अनेकांनी त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आज जितेंद्र आव्हाड यांनी आपण केलेल्या वक्तव्यावर माफी मागितली आणि […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“यांच्या” बोलण्या, वागण्यात कशातच “राम” उरलेला नाही! : आशिष शेलार

X : @NalavadeAnant मुंबईमहाराष्ट्रातील तमाम जनतेला आमचे आवाहन.. सावधान.!! युवराज म्हणजे तळ्या काठी “खोटे ध्यान” लावून बसणाऱ्या ढोंगी “बगळ्यांच्या टोळीचे म्होरके” आहेत. यांच्या बोलण्यात, वागण्यात कशातच “राम” उरलेला नाही, अशा शब्दांत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी पलटवार केला आहे. महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून आदित्य ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्राला आमदार अँड आशिष शेलार यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘कधीही हक्काने बोलवा हा भाऊ तुमच्यासोबत’, अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला ठाकरेंचा पाठिंबा

मुंबई आज मुंबईच्या आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारलं आहे. अनेकांना गेल्या चार महिन्यांपासून मानधन मिळालेलं नाही तर अनेकांना मिळणारं मानधन अत्यंत तुटपुंज्या स्वरुपातील आहे, असा आरोप अंगणवाडी सेविकांकडून केला जात आहे. या आंदोलनाला उद्धव ठाकरेंनी भेट दिली. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणा अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि कधीही हक्काने बोलवा हा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

22 जानेवारी रोजी राज्यात दारू, मटण दुकानं बंद ठेवा – राम कदम

मुंबई २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. केंद्राकडून याची भव्य तयारी सुरू आहे. दरम्यान भाजप प्रवक्ता आणि आमदार राम कदम यांनी पंतप्रधान एकनाथ शिंदे यांना विनंती करणार पत्र पाठवलं आहे. राम कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना २२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या सोहळ्यानिमित्ताने महाराष्ट्रातील दारूची दुकानं आणि चिकन-मटणची […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महालक्ष्मी रेसकोर्सची जागा बळकावण्याचा प्रयत्न, आदित्य ठाकरेंचे राज्य सरकारवर गंभीर आरोप

मुंबई महालक्ष्मी येथील रेसकोर्सची जागा बळकावण्याचा राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंकडून करण्यात आला आहे. या जागेवर पुनर्विकासाच्या नावाखाली व्यावसायिक वापर करण्याचा प्रयत्न भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी सोशल मीडियावरुन केला. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या जवळची एक व्यक्ती विकासक रेसकोर्स व्यवस्थापनाला करार करण्यासाठी धमकी देत असल्याचं आदित्य […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पुढील 30 दिवसात राज्यात मोठी राजकीय घडामोड, अंजली दमानियांचा दावा

मुंबई सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या दाव्यात पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पुढील ३० दिवसात राज्यात मोठी राजकीय घडामोड घडणार असल्याचा दावा दमानियांनी केला आहे. जानेवारी महिन्यात ऑपरेशन लोट्स घडण्याची शक्यता असून यात काँग्रेस फूटेल, राम मंदिराच्या सोहळ्यापूर्वी किंवा नंतर मोठी घडामोड घडेल. भाजप काँग्रेसला फोडण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे राज्यात विरोधी पक्षच उरणार […]