सतर्क नागरिकाचे कौतुक! तक्रारीनंतर बीएमसीची तात्काळ कारवाई
मुंबई: मलबार हिल परिसरातील कमला नेहरू पार्कजवळील निःशुल्क शौचालयात अनधिकृत वसुली सुरू असल्याची तक्रार पत्रकार विजय गायकवाड यांनी केली आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) झटपट कारवाई करून संबंधित कंत्राटदारावर ₹१,००० रुपयांचा दंड ठोठावला. गायकवाड यांनी रविवारी (९ नोव्हेंबर) सोशल मीडियावर बीएमसीला टॅग करून माहिती दिली होती की, पार्कसमोरील सुलभ इंटरनॅशनलच्या शौचालयांवर ‘फ्री युरिनल’ असा फलक […]
