ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

कुणी म्हणतं फसवाफसवी, कुणी म्हणतं प्रत आलीच नाही; भुजबळांच्या राजीनाम्याच्या दाव्यामागची इनसाइट स्टोरी

मुंबई ओबीसी समाजाचे नेते आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी १६ नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. मात्र या दाव्यावरून अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. यात विरोधी पक्षांसह शिंदे गट आणि भाजपमधील नेत्यांचा समावेश आहे. जितेंद्र आव्हाड – छगन भुजबळांनी जर राजीनामा दिला आहे तर सरकारी गाडी, बंगला असं कसं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

सरकारकडून नियम डावलून नियुक्त्या, प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांचे खच्चीकरण; वडेट्टीवारांचा घणाघात

मुंबई कमाल नागरी जमीन धारणा (युएलसी) घोटाळा प्रकरणात सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) ने समन्स बजावल्याने ज्यांची चौकशी झाली, असे अधिकारी दिलीप ढोले यांची नुकतीच शासनाने सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक या महत्वपूर्ण पदावर नियुक्ती केली आहे. तर बृहन्मुबंई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून डॉ. सुधाकर शिंदे यांची नियुक्ती शासनाने केली आहे. या नियुक्त्यांमुळे सरकारकडून भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

गोळीबाराचा CCTV Video आला समोर, खुर्चीत शांतपणे बसले होते महेश गायकवाड, मात्र…;रात्री पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?

मुंबई भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर ६ गोळ्या झाडल्यानंतर राज्यभरात याचे पडसाद उमटले. महेश गायकवाड यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या शरीरातील सहा गोळ्या बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. दरम्यान हिललाईन पोलीस स्टेशनमधील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यामध्ये एका खोलीत काही जणं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महेश गायकवाडांची प्रकृती गंभीर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल

मुंबई भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर ६ गोळ्या झाडल्यानंतर राज्यभरात याचे पडसाद उमटले. महेश गायकवाड यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या शरीरातील सहा गोळ्या बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. गायकवाड यांची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात पोहोचले आहेत. झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राज्यात शिंदे-फडणवीस-पवारांचे गुंडाराज, कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा, पोलिसांवर सरकारचा प्रचंड दबाव; पटोलेंचा हल्लाबोल

मुंबई कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाडांनी भरदिवसा शिवसेना शिंदे गटाचे कल्याणचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याच्या वृत्ताने राज्यात खळबळ उडाली आहे. भाजप आमदाराने महेश गायकवाड यांच्यावर तब्बल सहा गोळ्या झाडल्या. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटू लागले असून हे राज्याच्या गृहमंत्र्यांचं अपयश असल्याचा आरोप केला जात आहे. ‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रात फक्त गुन्हेगार पैदा होतील’ गोळीबार करणाऱ्या आमदाराचं वक्तव्य; वडेट्टीवारांचा मोठा दावा

मुंबई भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यात उल्हासनगर इथे पोलिस स्थानकात तेही पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये गोळीबार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांचा माज काही कमी व्हायचे नाव घेत नाही आहे. भाजपवाल्यांचे बॉस “सागर” बंगल्यावर आणि शिंदे गटाचे “बॉस” वर्षा बंगल्यावर बसून आहेत. त्यामुळे राज्यातील […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

उल्हासनगर गोळीबार प्रकरण राज्याच्या गृहमंत्र्यांचं अपयश, राजीनामा द्या; सुप्रिया सुळेंचा घणाघात

मुंबई कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाडांनी दिवसाढवळ्या शिवसेना शिंदे गटाचे कल्याणचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याच्या वृत्ताने राज्यात खळबळ उडाली आहे. भाजप आमदाराने महेश गायकवाड यांच्यावर तब्बल सहा गोळ्या झाडल्या. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटू लागले असून हे राज्याच्या गृहमंत्र्यांचं अपयश असल्याचा आरोप केला जात आहे. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाण्यातील रुग्णालयात शस्त्रक्रिया

मुंबई राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. ठाण्यात त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या डोळ्यांना त्रास जाणवत होता. डॉक्टरांकडून तपासणी करून घेतल्यानंतर त्यांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार आज शुक्रवार सकाळी ९ वाजता त्यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चष्म्याचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

सत्ताधारी आमदारांना 500 कोटींचा विकासनिधी, विरोधी आमदारांना निधीचं वाटप का नाही? वडेट्टीवारांचा सवाल

मुंबई सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना ५०० कोटींचा विकासनिधी तर विरोधी आमदारांना निधीवंचित ठेवल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई महानगरपालिकेत उघडकीस आला आहे. मुंबईतील ३६ पैकी २१ आमदार सत्ताधारी भाजप-शिवसेना शिंदे गटाचे तर १५ विरोधी पक्षांचे आहेत. गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेची निवडणूक अधांतरी आहे. सध्या महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. आमदारांना निधी उपलब्ध करण्याबाबतच्या फेब्रुवारी २०२३ च्या ठरावानुसार, डिसेंबर २०२३ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

धक्कादायक! बनावट कागदपत्रांद्वारे ठाण्यातील रुग्णालयाने घेतलं मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडून अर्थसहाय्य

मुंबई बनावट कागदपत्रान्वये मुख्यमंत्री सहाय्यता निधी या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री सचिवालयाकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत बोगस प्रकरण किंवा शासनाची फसवणूक घडल्यासंबंधातील माहिती मागितली होती. यानंतर मुख्यमंत्री सचिवालयाने बनावट कागदपत्रान्वये मुख्यमंत्री सहाय्यता निधीअंतर्गत अर्थसहाय्य घेतल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री […]