महाराष्ट्र ताज्या बातम्या

ज्ञान, तंत्रज्ञान, विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठी दावोस दौरा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा, एक लाख कोटींची गुंतवणूक येणार दावोस: स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने करण्यात येणारा दावोस दौरा हा भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात ज्ञान, तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठीचा महत्वाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर म्हणून रायगड-पेण ग्रोथ सेंटरची […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र भारताचे ‘गेटवे’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

झ्युरिक: “महाराष्ट्र विश्वासार्ह आहे. आम्ही जे सांगतो ते करून दाखवतो. त्यामुळेच जगभरातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावरचा विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारत’साठी मजबूत पार्श्वभूमी आणि सक्षम इकोसिस्टिम तयार केली असून, याच आधारावर यंदाही राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “महाराष्ट्र हे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबईचा कौल भाजपला : हिंदुत्व, विकास, राष्ट्रीय सुरक्षा – आणि देवेंद्र फडणवीसांचे निर्णायक नेतृत्व

मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने मिळवलेला ऐतिहासिक विजय हा केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्तांतरापुरता मर्यादित नाही. भारताच्या आर्थिक राजधानीतील जनतेकडून आलेला हा स्पष्ट राजकीय आणि वैचारिक संदेश आहे. मुंबईतील मतदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तसेच भाजपच्या हिंदुत्व, विकास आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या ठाम भूमिकेवर विश्वास व्यक्त केला आहे. प्रथमच मुंबईचे महापौरपद भाजपकडे जाणार असून, त्यामुळे देशाच्या आर्थिक […]

मुंबई ताज्या बातम्या

‘आरे’वर मुख्यमंत्री फडणवीसांचे दावे दिशाभूल करणारे; शिवसेनेचा आरोप

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरे कारशेड आणि झाडतोडीबाबत केलेले दावे अपूर्ण, दिशाभूल करणारे आणि वस्तुस्थितीला धरून नसल्याचा आरोप शिवसेना राज्य संघटक अखिल चित्रे यांनी केला आहे. फडणवीस यांच्या अलीकडील मुलाखतींमध्ये सातत्याने चुकीची माहिती दिली जात असल्याचा दावा करत त्यांनी वस्तुस्थिती मांडणारी सविस्तर टिपण्णी प्रसिद्ध केली आहे. अखिल चित्रे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री फडणवीस सतत […]

मुंबई ताज्या बातम्या

BMC elections : असा असेल मुंबई महापालिकेचा निकाल; भाजप शंभरीकडे, शिंदे सेनेला अर्धशतक अवघड?

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीची (BMC Elections) प्रक्रिया सुरू झाली असली, तरी कोणते पक्ष कोणत्या युतीत असतील आणि कोण किती जागा लढवणार, याचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, सरकारी पातळीवरील अंतर्गत अहवालानुसार भारतीय जनता पक्ष (BJP) यावेळी शंभरी पार करण्याच्या स्थितीत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्याउलट शिवसेना (एकनाथ शिंदे गट) (Shiv Sena) यांना ५० […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : स्मार्ट मीटरमुळे 99% ग्राहकांचे वीजबिल वाढलेले नाही — मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर : राज्यात राबविण्यात येत असलेली वीज स्मार्ट मीटर योजना उपयुक्त ठरली असून, हे मीटर बसविण्यात आलेल्या 99 टक्के ग्राहकांचे वीजबिल वाढलेले नाही, असे अहवाल उपलब्ध असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेतील प्रश्नोत्तर तासात दिली. या योजनेंतर्गत ग्राहकांना प्रत्येक तासाचा वीज वापराचा तपशील (रिपोर्ट) उपलब्ध होऊ शकतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : “मुंबई चंद्र–सूर्य असेपर्यंत महाराष्ट्राची राजधानीच राहील” : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावरच महायुती सरकारची वाटचाल सुरू राहील, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मांडली. एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानातून निर्माण झालेल्या संयुक्त महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही चंद्र–सूर्य असेपर्यंत महाराष्ट्राची राजधानीच राहील, अशी ठाम ग्वाही त्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Winter Session : मुंबई CSMT प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार; विधानसभेत CM फडणवीसांची घोषणा

नागपूर – मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानक प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. ही घोषणा होताच सभागृहात सदस्यांनी बाके वाजवून जोरदार स्वागत केले आणि “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी जय शिवाजी” असा जयघोष केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मागील अधिवेशनात CSMT परिसरात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

देवाभाऊची आर्थिक शिस्त आणि शिवसेनेला उतरती कळा 

X:  @vivekbhavsar राज्यात मंगळवारी नगरपालिका आणि नगर पंचायतसाठी मतदान होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाने जिल्हा परिषद, पंचायत समितीसह महापालिका निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील वर्षात 31 जानेवारीअखेर सर्व शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रकिया संपवून लोकनियुक्त प्रतिनिधीच्या हातात कारभार जाणे सर्वोच्च न्यायालयाला अभिप्रेत आहे, तसा आदेश आहे. कुठलीही स्थानिक स्वराज्य […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : संशोधित वितरण क्षेत्र योजनेसाठी महाराष्ट्राला मिळणार २६५५ कोटी!

नवी दिल्ली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis) यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर (Minister Manoharlal Khattar) यांची भेट घेऊन संशोधित वितरण क्षेत्र योजना (RDSS) अंतर्गत महाराष्ट्राला २६५५ कोटी रुपये देण्याची मागणी केली. हा निधी लवकरच देण्याचे आश्वासन ऊर्जामंत्री खट्टर यांनी दिले. याचबरोबर ८००० मेगावॅट-तास क्षमतेच्या बॅटरी स्टोरेज प्रकल्पासाठी व्यवहार्यता तूट निधी […]