मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील बैठकीत महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांवर चर्चा करताना. महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘दिल्ली मोहीम’…..!

पंतप्रधान मोदींसह सीतारामन, यादव यांच्या भेटी; उत्तन-विरार सागरी दुव्यासाठी निधीचा नवा मार्ग, प्रलंबित प्रकल्पांना केंद्राचा ‘पुश’ मिळविण्याचाही प्रयत्न मुंबई  — महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना केवळ राज्याच्या पातळीवर न ठेवता थेट केंद्राच्या दारात नेऊन त्यांना निधी, मंजुरी आणि धोरणात्मक पाठबळ मिळवून देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रणनीती सोमवारी दिल्ली दौऱ्यात स्पष्टपणे दिसून आली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र […]

चाकण MIDCमधील खराब रस्ते, खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक परिसराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उद्योग आकडेवारी आणि प्रत्यक्ष पायाभूत समस्यांतील विरोधाभास दर्शविणारे प्रतीकात्मक चित्र. महाराष्ट्र ताज्या बातम्या

३६ हजारांचा ‘आकड्यांचा खेळ’ की चाकणचा ‘खड्ड्यांतला उद्योग’…….?

वाजेंच्या संसद प्रश्नापासून पवारांच्या पाहणीपर्यंत उद्योग स्थलांतराचा मुद्दा तापला; मुख्यमंत्री फडणवीसांचा बचाव आकडेवारीवर, पण चाकणमधील २० उद्योगांच्या संभाव्य स्थलांतराचा प्रश्न कायम……! Anant Nalawade मुंबई — महाराष्ट्राच्या औद्योगिक आघाडीला आता आकडेवारीच्या कागदावर नव्हे, तर चाकणच्या रस्त्यांवरून कसोटीला उतरावे लागणार आहे….! त्याला कारणही तसेच आहे. महाराष्ट्रातील ३६,२११ खासगी कंपन्या गेल्या पाच आर्थिक वर्षांत liquidated, dissolved अथवा कंपनी रजिस्टरमधून struck off […]

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मराठी शिकवणी अभियानांतर्गत अमराठी व्यावसायिक चालकांना मराठी प्रशिक्षण देण्यात आले. महाराष्ट्र ताज्या बातम्या

१ लाख चालक शिकले मराठी; भाषा अभियानाला मोठा प्रतिसाद, सरकारचा दावा

“मराठीचा मान राखणाऱ्याला महाराष्ट्र कवेत घेईल”; १५ ऑगस्टपर्यंत प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन, १७ ऑगस्टला समारोप मुंबई : राज्यातील व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी राबविण्यात आलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला’ मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा परिवहन विभागाने केला आहे. राज्यभरातील एक लाखांहून अधिक अमराठी चालकांनी व्यवहारिक मराठीचे प्रशिक्षण पूर्ण केले असून, उर्वरित चालकांनी १५ ऑगस्टपूर्वी प्रशिक्षण पूर्ण करावे, असे […]

Chief Minister Devendra Fadnavis chairs a review meeting on MIDC land acquisition and industrial investment projects in Maharashtra. महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘उद्योगांसाठी जमीन, विकासाला वेग’; ६६ हजार एकर भूसंपादनाला मुख्यमंत्र्यांचा गतीमंत्र

एमआयडीसी प्रकल्पांचा आढावा; ९७ सामंजस्य करारांसाठी ७५ हजार एकर जमिनीची तयारी, भूसंपादन प्रक्रिया जलद करण्याचे निर्देश मुंबई: महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणुकीला अधिक वेग देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूसंपादन प्रक्रिया गतिमान करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. उद्योगांना आवश्यक जमीन वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय अडथळे दूर करणे, प्रक्रिया सुलभ करणे आणि औद्योगिक भूखंड वाटप अधिक कार्यक्षम बनविण्यावर सरकारचा […]

नाशिक आणि रायगड पालकमंत्रिपदावरील निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय आढावा बैठक. (प्रातिनिधिक चित्र) महाराष्ट्र ताज्या बातम्या

स्वातंत्र्यदिनापूर्वी पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार…?

महायुतीतील नव्या हालचालींनी राजकीय चर्चांना उधाण नाशिक-रायगडच्या निर्णयातून महायुतीतील सत्तासंतुलनाचा संदेश; भुजबळ, गोगावले आणि आदिती तटकरे यांच्या दाव्यांकडे राज्याचे लक्ष मुंबई: स्वातंत्र्यदिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना राज्यातील नाशिक आणि रायगड या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तब्बल दीड वर्षांपासून रखडलेला तिढा अखेर सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे हा प्रश्न आता केवळ प्रशासकीय राहिलेला नसून, भाजप, शिवसेना […]

मंत्रालयातील कार्यालयात मुद्रित वृत्तपत्रांच्या जागी टॅबलेटवर ई-पेपर वाचणारे अधिकारी आणि डिजिटल माहिती व्यवस्थापनाकडे होणारे संक्रमण दर्शविणारे प्रतिनिधिक चित्र. महाराष्ट्र ताज्या बातम्या

मंत्री-राज्यमंत्र्यांच्या कार्यालयांत १ सप्टेंबरपासून ‘हार्ड कॉपी’ बंद; ई-पेपर सदस्यतेला प्राधान्य

सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय; मुख्यमंत्री कार्यालयासाठी मात्र विद्यमान व्यवस्था कायम मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या माहिती व्यवस्थापन पद्धतीत महत्त्वाचा बदल करणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. १ सप्टेंबर २०२६ पासून उपमुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या कार्यालये तसेच शासकीय निवासस्थानी सामान्य प्रशासन विभागामार्फत मुद्रित वृत्तपत्रे आणि नियतकालिकांचा पुरवठा बंद करण्यात येणार असून, त्याऐवजी ऑनलाइन सदस्यतेद्वारे ई-पेपर उपलब्ध करून देण्यात […]

विरार–अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यातील शासकीय जमिनीचे सर्वेक्षण आणि आराखड्यांचा आढावा घेत असलेले अभियंते व एमएसआरडीसी अधिकारी यांचे प्रतिनिधिक चित्र. महाराष्ट्र ताज्या बातम्या

विरार–अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला गती; पालघरमधील शासकीय जमीन एमएसआरडीसीकडे हस्तांतरित

वसईतील ०.२८.७० हेक्टर जमीन नाममात्र दराने उपलब्ध; प्रकल्पाच्या अंमलबजावणीत महत्त्वाचा टप्पा मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या विरार–अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पाच्या अंमलबजावणीला राज्य सरकारने आणखी गती दिली आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील शासकीय जमीन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) हस्तांतरित करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली […]

पालघर पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित उच्चस्तरीय बैठक. महाराष्ट्र ताज्या बातम्या

पालघरसाठी पूरनियंत्रणाचा दीर्घकालीन आराखडा; विशेष मदत पॅकेजसह ‘होल्डिंग स्पॉट’ संकल्पनेला गती

₹५८४.४५ कोटींच्या पुनर्बांधणी प्रस्तावावर चर्चा; जागतिक बँकेच्या सहकार्याने स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश मुंबई: पालघर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरानंतर राज्य सरकारने केवळ तात्पुरत्या मदत उपाययोजनांवर न थांबता दीर्घकालीन पूरनियंत्रण आणि शाश्वत विकासाच्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पूरग्रस्तांसाठी विशेष मदत पॅकेज, वसई-विरार परिसरात ‘होल्डिंग स्पॉट’ विकसित करण्याची संकल्पना, जागतिक बँकेच्या सहकार्याने स्वतंत्र विकास […]

Revenue officials inspect a rural farm access road using digital land records and GPS survey equipment while police personnel provide security during the implementation of a land access order in Maharashtra. महाराष्ट्र ताज्या बातम्या

शेतरस्त्यांच्या वादांवर सरकारची मोठी सुधारणा; ई-मेल नोटीस आणि मोफत पोलिस संरक्षणाची नवी तरतूद

महसूल व्यवस्थेतील बदल की ग्रामीण प्रशासन अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न? मुंबई : ग्रामीण महाराष्ट्रातील शेतरस्ते, वहिवाट, बांध, पाण्याचे प्रवाह आणि अतिक्रमणाशी संबंधित वादांवर जलद निर्णय व्हावेत या उद्देशाने राज्य सरकारने मामलतदार न्यायालय अधिनियम, १९०६ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार सुनावणीच्या नोटिसा आता ई-मेलद्वारे पाठविण्याची तरतूद करण्यात आली असून, तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्यास बाधित शेतकऱ्याला मोफत पोलिस संरक्षण उपलब्ध […]

Chief Minister Devendra Fadnavis attends the launch of the Bharat Taxi cooperative mobility service during an event in Maharashtra. महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘भारत टॅक्सी’चा महाराष्ट्रात शुभारंभ; सहकार मॉडेलमधून ३ ते ४ हजार रोजगारांचा सरकारचा दावा

चालक भागधारक असलेले सहकारी मॉडेल; सर्ज प्रायसिंग नसल्याचा दावा मुंबई : राज्यातील ॲप-आधारित प्रवासी वाहतूक क्षेत्रात सहकाराच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था उभारण्याच्या उद्देशाने ‘भारत टॅक्सी’ सेवेचा महाराष्ट्रात अधिकृत शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. दिल्ली आणि गुजरातनंतर महाराष्ट्र हा या उपक्रमाची अंमलबजावणी करणारा तिसरा राज्य ठरला […]