'वर्षा' निवासस्थानी झालेल्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण; त्यानंतर जयंत पाटील यांनी भेटीमागील कारण स्पष्ट करत महायुती प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. (प्रतिकात्मक चित्र) महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘वर्षा’वरील भेटीमागचे गूढ अखेर उलगडले; महायुती प्रवेशाच्या चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम

ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेच्या प्रकरणासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट; पक्ष सोडण्याचा प्रश्नच नाही, स्पष्ट भूमिका मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात सुरू झालेल्या विविध तर्क-वितर्कांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी बुधवारी स्पष्ट उत्तर दिले. ही भेट महायुतीत प्रवेश, मंत्रिपद किंवा पक्ष विलीनीकरणासाठी नसून, सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेच्या […]

महाराष्ट्रातील आधुनिक शहर विकासाचे प्रतीकात्मक चित्र, मेट्रो रेल्वे, उंच इमारती, स्मार्ट रस्ते, पाणीपुरवठा व्यवस्था आणि अर्बन चॅलेंज फंड दर्शवणारे दृश्य. महाराष्ट्र ताज्या बातम्या

९० हजार कोटींचा ‘अर्बन चॅलेंज’!

महाराष्ट्रातील शहरांच्या कायापालटासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मेगा ब्लूप्रिंट पहिल्या टप्प्यात ४४,८०० कोटींच्या प्रकल्पांना गती; केंद्र, राज्य आणि बाजारातून निधी उभारणीचा आराखडा मुंबई– महाराष्ट्रातील शहरांच्या विकासासाठी तब्बल ९० हजार कोटी रुपयांच्या ‘अर्बन चॅलेंज फंड’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सोमवारी गती दिली. पहिल्या टप्प्यात ४४,८०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याचा आराखडा निश्चित करण्यात आला असून, त्यासाठी केंद्र […]

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाबाबत भूमिका मांडताना. महाराष्ट्र ताज्या बातम्या

२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहावेत; बावनकुळेंची भूमिका, नेतृत्वबदलाच्या चर्चांना उत्तर

‘मुख्यमंत्री होण्याची कुणीही घाई करू नये’; महसूलमंत्र्यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत मुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला ठाम पाठिंबा दर्शवित नेतृत्वबदलाच्या चर्चांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये बावनकुळे यांनी, “देवेंद्र फडणवीसच २०३४ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहावेत, ही १४ कोटी जनतेची भावना आहे. मुख्यमंत्री होण्याची कुणीही घाई करू […]

विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होत मुंबईच्या विकासाविषयी भाष्य करताना भाजप आमदार संजय उपाध्याय. महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘मुंबई बदलते आहे’; विधानसभेत संजय उपाध्याय यांनी मांडला विकासाचा अजेंडा

मुंबई: विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होत भाजपचे बोरीवलीचे आमदार संजय उपाध्याय यांनी मुंबईतील पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, पाणीपुरवठा, वाहतूक, पर्यावरण, शिक्षण आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित विविध मुद्दे सभागृहात मांडले. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या विकासकामांचे कौतुक करत विरोधकांवरही टीका केली. संपूर्ण अधिवेशनात विरोधकांकडे जनतेसमोर मांडण्यासारखा कोणताही ठोस मुद्दा नव्हता. विकासाच्या विषयावर बोलण्याचे धैर्य त्यांनी […]

MNS chief Raj Thackeray and Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis in a split editorial image with the Vidhan Bhavan and a blurred Facebook post in the background, symbolising Raj Thackeray’s criticism of the Chief Minister through a social media post. महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर थेट निशाणा; ‘सत्तेचा माज’, ‘तुमच्या मौनाचं कारण काय?’ असा सवाल

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष Raj Thackeray यांनी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना उद्देशून फेसबुकवर केलेल्या सविस्तर पोस्टमधून राज्यातील सत्ताधारी नेतृत्वावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. भाजपच्या काही आमदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मौनावरही थेट प्रश्न उपस्थित केला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, केंद्रातील भाजप […]

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पवना जलवाहिनी प्रकल्पासंदर्भातील उच्चस्तरीय बैठकीत वरिष्ठ मंत्री आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करताना. महाराष्ट्र ताज्या बातम्या

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करूनच पवना जलवाहिनी प्रकल्प राबविणार; २०५० पर्यंतच्या जलआराखड्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुणे-पिंपरी चिंचवडच्या भविष्यातील पाणीगरजा लक्षात घेऊन दीर्घकालीन नियोजनावर भर मुंबई : पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेशातील वाढत्या पाणीगरजा लक्षात घेऊन राज्य सरकारने पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्पाबाबत महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. शेतकऱ्यांची संमती, विश्वास आणि संवादाशिवाय हा प्रकल्प पुढे नेला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. याचबरोबर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या २०५० पर्यंतच्या पाणीपुरवठ्याचा सर्वसमावेशक […]

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis speaking in the Legislative Assembly while announcing stringent action, including MCOCA provisions, against organised gangs that use children for criminal activities. महाराष्ट्र ताज्या बातम्या

बालकांचा गुन्हेगारीसाठी वापर करणाऱ्यांवर मकोका; कायदा अधिक कठोर करण्यासाठी उच्चस्तरीय समिती : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई: बालकांचा वापर संघटित गुन्हेगारी, अमली पदार्थांची तस्करी, मद्यविक्री किंवा इतर गंभीर गुन्ह्यांसाठी होत असल्याचे आढळल्यास संबंधित टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडली. प्रश्नोत्तराच्या तासात भाजप आमदार अर्जुन खोतकर यांनी जालना जिल्ह्यातील काही गुन्हेगारी घटनांमध्ये बालकांचा वापर होत असल्याचा मुद्दा […]

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis addressing the Legislative Assembly while discussing drone and satellite-based crop damage assessment for farmers. महाराष्ट्र ताज्या बातम्या

केळी उत्पादकांसाठी ड्रोन आणि सॅटेलाइट सर्वेक्षणाचा मार्ग; पीक नुकसानीच्या अचूक मूल्यांकनासाठी सरकारचा निर्णय

विमा दावे, नुकसानभरपाई आणि पंचनाम्यांतील वाद कमी करण्याचा प्रयत्न मुंबई : उत्तर महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीच्या प्रश्नावर राज्य सरकारने तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांचा मार्ग स्वीकारला आहे. पीक नुकसानीचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी ड्रोन, सॅटेलाइट इमेजरी आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून, यामुळे पीक विमा दावे, पंचनामे आणि नुकसानभरपाई प्रक्रियेत अधिक […]

Transport Minister Pratap Sarnaik addressing the Maharashtra Legislative Assembly while announcing allowance and salary hike benefits for ST employees. महाराष्ट्र ताज्या बातम्या

८६ हजार एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा; महागाई भत्ता ५८ टक्क्यांवर  

मुंबई : पावसाळी अधिवेशनादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवरून आंदोलनाची शक्यता व्यक्त केली जात असतानाच महायुती सरकारने मंगळवारी राज्यातील सुमारे ८६ हजार एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून, त्यानंतर २९ जून रोजी प्रस्तावित आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. विधानसभा आणि विधान […]

Chief Minister Devendra Fadnavis informs the Maharashtra Legislative Assembly that the state ranked second in India in registered crimes against women, citing NCRB data during the Monsoon Session on Tuesday. महाराष्ट्र ताज्या बातम्या

महिलांवरील अत्याचारांत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर; विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

मुंबई : महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असल्याचा दावा राज्य सरकारकडून सातत्याने केला जात असतानाच, महिलांवरील अत्याचारांच्या नोंद झालेल्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार २०२४ मध्ये राज्यात महिलांवरील अत्याचाराचे तब्बल ७० हजार ५१५ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. […]