महाराष्ट्र ताज्या बातम्या

Elections : निवडणूक आयोगाच्या घोळामुळे निकाल लांबणीवर : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची तीव्र टीका

मुंबई — “निवडणूक आयोगाच्या घोळामुळे नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल लांबले आहेत. ज्या ठिकाणांचे निकाल प्रलंबित होते, तिथल्याच निवडणुका पुढे ढकलायला हव्या होत्या. पण आयोगाने चुकीच्या पद्धतीने व्यापक निर्णय घेतल्याने आता सर्वच निकालांवर परिणाम झाला,” अशा शब्दांत महसूलमंत्री आणि नागपूर–अमरावती जिल्ह्यांचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज निवडणूक आयोगावर कडाडून टीका केली. ते म्हणाले, “राज्य सरकारने अनेकदा चर्चा केली, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Rahul Gandhi : राहुल गांधींनी आधी मतदारयादीचा अभ्यास करावा – महसूलमंत्री बावनकुळे यांचा पलटवार

मुंबई: “राहुल गांधींचे आरोप हे निव्वळ वेडेपण आहे. त्यांनी आधी महाराष्ट्रातील मतदार याद्यांचा अभ्यास करावा. दुबार नावे असणे हा काही नवीन प्रकार नाही — ती संपूर्ण राज्यभर आहेत. कामठीत माझ्याविरुद्ध लढलेल्या काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश भोयर यांचेच नाव दुबार आहे, ते राहुल गांधींना दिसत नाही का?” असा टोला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी येथे पत्रकार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मतचोरीतही भाजपाला हिंदू-मुस्लीम दिसते; त्यांच्या बुद्धीची किव करावी वाटते — हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : राज्यात व केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने मतचोरी करून सत्ता मिळवली, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. “मतचोरीसारख्या गंभीर मुद्द्यातही भाजपाला हिंदू-मुस्लीमच दिसते; त्यांची ही मानसिकता पाहून दया वाटते,” अशी टीका त्यांनी केली. टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले, “मतचोरीचा मुद्दा सर्वप्रथम काँग्रेस व राहुल गांधींनी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

देशभरात विशेष मतदार पुनरिक्षण मोहिमेला सुरुवात; महाराष्ट्राला वगळल्याने वाद — बॅरिस्टर विनोद तिवारींची सुप्रीम कोर्टात जाण्याची घोषणा

मुंबई : देशभरात १ नोव्हेंबरपासून मतदार याद्यांचे “विशेष सघन पुनरिक्षण अभियान” (Special Intensive Revision – SIR) सुरू झाले असून तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये या प्रक्रियेची अंमलबजावणी प्राधान्याने होत आहे. मात्र, या मोहिमेत महाराष्ट्राचा समावेश न केल्याने गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मतदार यादीतील मोठ्या प्रमाणातील अनियमितता दूर करण्यासाठी महाराष्ट्रालाही या प्रक्रियेत सामील करण्यात यावे, […]