निवडणूक रोख्यांचा वापर खंडणीवसुलीसाठी, 4 हजार कोटींचा हिशेब नाही; प्रशांत भूषण यांचा मोठा दावा
मुंबई : निवडणूक रोखेंचा वापर खंडणीवसुली, लाचखोरीसाठी झाला असून या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करण्याची मागणी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ प्रशांत भूषण यांनी केली आहे. पुढील आठवड्यात यासंदर्भात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे रविवारी त्यांनी सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे अद्याप चार हजार कोटींचे निवडणूक रोखे कुणाला दिले, याचा हिशेब नसल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. गेल्या […]