महाराष्ट्र ताज्या बातम्या

वन्यजीव कायद्यात सुधारणा करण्याची मागणी; माने यांची पर्यावरणतज्ञ माधवराव गाडगीळ यांच्याशी तातडीने चर्चा करण्याची सूचना

पुणे : वाढत्या मानव–वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जुनाट झालेल्या वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये तातडीने सुधारणा करणे अत्यावश्यक असून, त्यासाठी ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ. माधवराव गाडगीळ यांच्याशी थेट चर्चा करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते सुनील माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.याबाबतचे सविस्तर पत्र त्यांनी ई-मेलद्वारे मुख्यमंत्री कार्यालयात पाठवले […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

संयुक्त राष्ट्रसंघाच्या ब्राझीलमधील हवामान बदल COP30 परिषदेसाठी भारत सरकारच्या शिष्टमंडळात महाराष्ट्रातून भाजप नेते संतोष गांगण यांचा समावेश

मुंबई : ब्राझीलमधील बेलेम शहरात होणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक हवामान बदल परिषदेत (Conference of Parties – COP30) भारत सरकारच्या अधिकृत शिष्टमंडळात महाराष्ट्रातील भाजप नेते संतोष गांगण यांचा समावेश करण्यात आला आहे. COP30 परिषदेमध्ये जगभरातील देश हवामान बदलाच्या गंभीर समस्यांवर उपाय शोधण्यासाठी एकत्र आले आहेत. ग्रीनहाऊस वायूंचे उत्सर्जन कमी करणे, हवामान- अनुकूल धोरणे स्वीकारणे, आणि आवश्यक […]