महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : विधानसभेच्या विशेष बैठकीत गोंधळ: सहापैकी तीन लक्षवेधी रखडल्या; मंत्र्यांकडे उत्तर, पण सदस्यांकडे नाही!

नागपूर : विधीमंडळात लक्षवेधींसह अधिकाधिक कामकाज व्हावे यासाठी सकाळी १० वाजता घेतली जाणारी विशेष बैठक आज गोंधळात पार पडली. बुधवारी सभागृहासमोर एकूण पाच लक्षवेधी दाखल होत्या. १० वाजता प्रक्रिया सुरू झाली—पहिली लक्षवेधी पार पडली, दुसऱ्या वेळी संबंधित सदस्य अनुपस्थित असल्याने ती घेतली गेली नाही. तिसरी लक्षवेधी अतिवृष्टीमुळे हानी झालेल्या २९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांशी संबंधित—राज्यभरातील कृषी क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची होती. […]