मुंबई विद्यापीठातील TYBCom प्रश्नपत्रिका फूट प्रकरण: SIT स्थापन करण्याची अभाविपची राज्यपालांकडे मागणी
मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये तृतीय वर्ष बी.कॉम. (TYBCom) अंतिम सत्राच्या प्रश्नपत्रिका फूटीचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) मुंबईतर्फे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास हादरला असून, हा केवळ निष्काळजीपणाचा प्रकार नसून संघटित भ्रष्टाचार आणि संगनमताचे लक्षण असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. […]


