मुंबई

पत्रकार सन्मान योजना आणि कल्याण निधी स्वतंत्र करुन प्रत्येकी शंभर कोटी रुपयांची तरतूद करा : योगेश वसंत त्रिवेदी यांची मागणी

By: योगेश त्रिवेदी मुंबई: आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना आणि शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी या दोन्ही योजना स्वतंत्र करुन या दोन्ही योजनांसाठी प्रत्येकी किमान शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी, तसेच या योजनेचा लाभ पत्रकारांना मिळण्यासाठी जाचक अटी काढून टाकण्यात याव्यात. ज्येष्ठ पत्रकारांनी जाचक अटींच्या तिरडीवरुनच सरणावर जावे अशी अपेक्षा सरकारची आहे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

सुजाता आनंदन यांच्या निधनाने पुरोगामी विचारांचा निर्भीड पत्रकार काळाच्या पडद्याआड, नाना पटोलेंचा शोकसंदेश

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, स्तंभलेखक सुजाता आनंदन यांच्या अकाली निधनाचे वृत्त दुःखद आणि मनाला चटका लावून गेले. सुजाता आनंदन यांच्या निधनाने सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणा-या पुरोगामी विचारसरणीच्या निर्भीड पत्रकाराला आपण गमावले आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत. सुजाता आनंदन यांच्या निधनावर दुःख व्यक्त करून पटोले म्हणाले की, सुजाता […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांवरील बहिष्कार ही घमंडिया आघाडीची हुकूमशाही….!

Twitter : @NalavadeAnant मुंबई: केवळ आपल्या सुरात सूर मिसळत नाही म्हणून देशातील प्रमुख वृत्तवाहिन्यांवरील नामवंत पत्रकारांवर बहिष्कार टाकून विरोधकांच्या घमंडिया आघाडीने माध्यम स्वातंत्र्याच्या गळचेपीची हुकूमशाही मानसिकता दाखवून दिल्याची घणाघाती टीका प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केली. इंडी आघाडीचा बहिष्काराचा पवित्रा म्हणजे माध्यमक्षेत्राला थेट धमकीचा इशारा असून पत्रकारांनी, पत्रकार […]

मुंबई

ठोस माहिती असल्याशिवाय पत्रकारांनी कोणालाही लक्ष्य करू नये – राज्यपाल

Twitter : @therajkaran मुंबई पूर्विची पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता यामध्ये बदल झाला आहे. पत्रकारिता ही सकारात्मक, विधायक दृष्टिकोन असलेली असावी. सर्वसामांन्यांच्या समस्या पत्रकारांनी मांडाव्या आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा, मात्र, कोणालाही विनाकारण तसेच ठोस माहिती असल्याशिवाय लक्ष्य करू नये, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे मुंबई मराठी पत्रकार संघ आचार्य […]