Assembly Session: मागाठाणे पाडकामावर विधिमंडळात संतापाचा स्फोट; बाऊन्सर्स कुणी आणले याची चौकशी करणार—उदय सामंत
नागपूर –: मुंबई उपनगरातील मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील शुक्ला कंपाऊंड येथे 1967 पासून अस्तित्वात असलेल्या निवासी व व्यावसायिक बांधकामांवर विकासक–मनपा अधिकारी संगनमताने, बाऊन्सर्सच्या मदतीने अमानुष पद्धतीने घातलेला घाला हा मुद्दा आज विधानसभेच्या विशेष बैठकीत प्रचंड गाजला. शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी ही लक्षवेधी उपस्थित करताच सत्तारूढ सदस्यांनीही संताप व्यक्त केला आणि संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सुर्वे म्हणाले, “बाऊन्सर्सनी रहिवाशांना घरातून सामानसुद्धा […]

