“मी भाजपचा निष्ठावान सैनिक; 2029 पर्यंत महाराष्ट्रातच राहणार” — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई — “मी भारतीय जनता पक्षाचा निष्ठावान सैनिक आहे. येत्या 2029 पर्यंत मी महाराष्ट्रात पदावर निश्चितपणे कार्यरत राहीन. त्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार दिल्लीला जायचे का, हे ठरेल,” असे स्पष्ट विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘वर्षा’ निवासस्थानी पत्रकारांसोबतच्या दिवाळी सुसंवादात केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व पत्रकारांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि मनमोकळ्या वातावरणात सहज, विनोदी शैलीत संवाद […]
