तुकाराम मुंडे यांच्यावर नियमबाह्य पेमेंट्स व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप; विधानसभेत गदारोळ, कामकाज तहकूब
नागपूर – सततच्या बदल्यांमुळे राज्यभरात चर्चेत असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. नागपूरमधील भाजप सदस्याने मुंडे यांनी हस्तकाकरवी स्वतःला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप विधानसभेत करताच सभागृहात एकच खळबळ उडाली, आणि गदारोळामुळे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. भाजप आमदार कृष्ण खोपडे आणि प्रवीण दटके यांनी आरोप केला की महाविकास आघाडी सरकारच्या काळात नागपूर महापालिकेचे आयुक्त असताना, […]
