महाराष्ट्र ताज्या बातम्या

Gram Panchayat Election : प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर; ७ एप्रिलला प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध होणार

मुंबई: राज्यात जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत ज्यांची मुदत संपत आहे, अशा तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा अधिकृत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार २० फेब्रुवारी २०२६ पासून प्रभाग रचनेचे काम सुरू होणार असून ७ एप्रिल २०२६ रोजी ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड: जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी २५, पंचायत समितीसाठी ४३ अर्ज

दोन्ही सेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन महाड: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. महाड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ५ गटांसाठी एकूण २५ तर पंचायत समितीच्या १० गणांसाठी ४३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ५ फेब्रुवारी रोजी होणार असून, ७ फेब्रुवारी रोजी निकाल […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Election Day: “बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय” – उद्धव ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले

मुंबई: मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी गुरुवारी मतदान पार पडले. आज सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मात्र त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी थेट निवडणूक आयोगाच्या कारभारावर जोरदार टीका केली. “मतदान हा आजचा नवा विषय नाही. पण यंदा पहिल्यांदाच मुंबईसह काही महानगरपालिकांमध्ये मतदारांच्या बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याचे प्रकार समोर आले. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

ZP elections: राज्यातील १२ जिल्हा परिषद – १२५ पंचायत समितींच्या निवडणुका जाहीर

५ फेब्रुवारीला मतदान, ७ फेब्रुवारीला मतमोजणी मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठा निर्णय घेत राज्य निवडणूक आयोगाने अखेर १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितींच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीनुसार या निवडणुका घेतल्या जाणार असून ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान आणि ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Elections: सत्ताधारी महायुती सरकारच्या नेत्यांना निवडणूक आयोगाचा दणका!

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूक प्रचारादरम्यान आचारसंहिता लागू असतानाही महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी “लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट दोन हप्त्यांचे ३ हजार रुपये जमा होणार” अशा घोषणा सत्ताधारी नेत्यांकडून केल्या जात होत्या. मात्र, अखेर राज्य निवडणूक आयोगाने या प्रचाराला जोरदार दणका दिला आहे. या कारवाईमुळे महायुतीच्या नेत्यांनी पाहिलेल्या मतांच्या स्वप्नांवर पाणी फिरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात […]

मुंबई ताज्या बातम्या

BMC election : कुर्ल्यातील वॉर्ड क्रमांक १६७ मधून महायुतीचा उमेदवार हद्दपार

By Raju Zanke मुंबई – राज्यातील २९ महानगरपालिकांचा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असतानाच, मुंबई महानगरपालिकेची सत्ता ताब्यात घेण्याचा निर्धार करणाऱ्या भाजप-शिवसेना महायुतीला कुर्ल्यातील वॉर्ड क्रमांक १६७ मध्ये उमेदवारच मिळाला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कुर्ला पश्चिम येथील वॉर्ड क्रमांक १६७ हा ओबीसी महिलांसाठी राखीव आहे. या मतदारसंघातून काँग्रेस, समाजवादी पार्टी, शिवसेना (उबाठा), पीपल्स […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : हिवाळी अधिवेशन संपताच 29 महानगरपालिका आणि 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा धडाका?

राज्य निवडणूक आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात; 10 डिसेंबरपर्यंत अंतिम मतदार यादी मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 15 डिसेंबरला संपताच महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका आणि 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची घोषणा केव्हाही होऊ शकते, असे राजकीय निरीक्षकांकडून संकेत मिळत आहेत. दुसरीकडे, राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेच्या तयारीला जोरदार गती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Elections : निवडणूक आयोगाच्या घोळामुळे निकाल लांबणीवर : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची तीव्र टीका

मुंबई — “निवडणूक आयोगाच्या घोळामुळे नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल लांबले आहेत. ज्या ठिकाणांचे निकाल प्रलंबित होते, तिथल्याच निवडणुका पुढे ढकलायला हव्या होत्या. पण आयोगाने चुकीच्या पद्धतीने व्यापक निर्णय घेतल्याने आता सर्वच निकालांवर परिणाम झाला,” अशा शब्दांत महसूलमंत्री आणि नागपूर–अमरावती जिल्ह्यांचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज निवडणूक आयोगावर कडाडून टीका केली. ते म्हणाले, “राज्य सरकारने अनेकदा चर्चा केली, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

“या निवडणुकीत फक्त पैशांचा पूर नव्हे तर अतिवृष्टीचे दर्शन!”: उद्धव ठाकरे यांची सत्ताधाऱ्यांवर तोफेची झोड

मुंबई – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचार महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी राज्यभर तापवला असताना, प्रचाराला अवघे पाच दिवस शिल्लक असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे खास पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर ठाकरी शैलीत जोरदार हल्ला चढवला. “सत्तेत सहभागी असलेले तिन्ही पक्षांचे नेते आणि मंत्री एकमेकांवर आरोपांची फेकाफेक करत राज्यभर आपलेच वाभाडे काढत आहेत. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अखेर व्हायचे ते झाले… शरद पवार ठाकरे बंधूंसोबत!

मुंबई– मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवायचे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसला आज स्पष्ट फटका बसला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण केंद्रातील बैठकीत थेट घोषणा करत आपला पक्ष उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेसोबत निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसने अलीकडेच ’मनसे नको’ अशी अट ठेवत महाविकास आघाडीचा […]