Marathwada: मतदारांनी ठरवले… मराठवाडा कोणाचा? पाच महानगरपालिकांचे निकाल आज स्पष्ट होणार
नांदेड: मराठवाड्यातील पाच महानगरपालिकांसाठी झालेल्या मतदानानंतर आज शुक्रवारी मतमोजणी होत असून, सायंकाळपर्यंत मतदारांनी कोणाला पसंती दिली याचे चित्र स्पष्ट होणार आहे. अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाले असले तरी निकालाकडे संपूर्ण मराठवाड्याचेच नव्हे तर राज्याचेही लक्ष लागले आहे. यंदा ज्येष्ठ नागरिकांसह नवख्या तरुण मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. मात्र एकूणच मतदानाची टक्केवारी अपेक्षेपेक्षा कमी राहिली. राजकीय विश्लेषकांच्या मते, […]


